Chandrakant Patil | एक मास्क विकत घेतला नाही, चेक हातात घेऊन फिरले, सगळा पैसा केंद्रानं दिला; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने (MVA government) जनतेला आवळा दिला. सगळा निधी केंद्राने दिला, त्यांनी एक मास्क देखील विकत घेतला नाही, केवळ चेक हातात घेऊन फिरत होते, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

 

राज्य सरकारला इशारा

 

राज्यात मुख्यमंत्री बदलले काय ? घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायची असते. शरद पवार (Sharad Pawar) कसे काय घोषणा करतात. उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांबाबत घोषणा केली पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यावर (st employees strike) कारवाई केली तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह रस्त्यावर उतरु असा इशारा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारला दिला आहे.

 

राऊत कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात

 

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टिका करताना चंद्रकांत पाटील म्हणाल, पोटनिवडणुकीमध्ये (By-election) सर्वाधिक जागा भाजपने (BJP) जिंकल्या आहेत. संजय राऊत हे दुर्बीण घेऊन बसले आहेत. कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात, संपूर्ण पोशाख ते बघत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच कमलाबेन डेलकर (Kamalaben Delkar) यांचा विजय हा शिवसेनेचा (Shivsena) विजय म्हणायचा का? असा सवाल त्यांनी केला आहे. 2024 मध्ये परिस्थिती बदलेल असे संजय राऊत म्हणाले होते, यावर बोलताना जनता काय करायचे ते ठरवेल, असं पाटील यांनी सांगितलं.

 

आम्ही कपटी नाही, निर्णयाचे स्वागत करु

 

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले (Reduced petrol-diesel rate) आहेत. आता राज्य सरकारने देखील दर कमी केले पाहिजेत. 14 राज्यांनी देखील दर कमी केले आहेत. महाराष्ट्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. इंधनाबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असेल तर आम्ही स्वागत करु असं पाटील यांनी सांगितले. तसेच आम्ही कपटी नाही, पण माझं चॅलेंज आहे हे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही, असे देखील पाटील म्हणाले.

 

Web Title : Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil slam mva government said union government gave money during corona time

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Devendra Fadnavis | शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन फडणवीसांनी साधला निशाणा, म्हणाले – ‘ज्यांना काही समजत नाही अशी मंडळी…’

Post office franchise | फक्त 5 हजारात घेऊ शकता पोस्ट ऑफिसची फ्रेंचायजी, पहिल्या दिवसापासून मोठी कमाई; जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

WhatsApp च्या या जुन्या फीचरमध्ये होणार मोठा बदल, तुम्ही सुद्धा नक्कीच करत असाल वापर; जाणून घ्या