Chandrakant Patil | ‘शरद पवार तेव्हा म्हणाले होते मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला काय? आता…’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आज (मंगळवारी) सांगली (Sangli News) जिल्हा दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढला होता. आता मात्र संपूर्ण महाविकास आघाडी सरकारलाच लकवा भरल्याची स्थिती आहे.’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

 

‘महाविकास आघाडी सरकारच्या हातालाच नव्हे, तर बुद्धीला लकवा मारल्याची स्थिती आहे,’ अशी टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. ‘या सरकारमध्ये कोणताच ताळमेळ नाही यांच्याकडून एकही काम पूर्ण झाले नाही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटलेले नाहीत प्रत्येक समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सध्याच्या महाविकास आघाडी सरकारची स्थिती याहीपेक्षा भयानक आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. 60 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी अजून सरकारला यावर तोडगा काढता आलेला नाही.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना या सरकारने बंद पाडल्या,’ अशी टीका त्यांनी केली.

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil strongly criticised maha vikas aghadi government and sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा