Chandrakant Patil | पुणे महापालिकेत आता आम्ही शंभरी क्रॉस करू! पालकमंत्री झाल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘आमच्यासाठी…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | विरोधकांनी केलेल्या चौफेर टीकेनंतर अखेर शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) मोठ्या विलंबानंतर शनिवारी संध्याकाळी विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची (Guardian Minister) घोषणा केली. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. यानंतर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) पुण्यातील पीएफआयच्या (PFI) घोषणाबाजीवरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

 

तळेगाव येथील जनआक्रोश आंदोलनात शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर (State Government) आरोप करताना म्हटले होते की, पुण्यात पीएफआयच्या घोषणाबाजीचा गैरप्रकार घडला आहे. ज्यांनी कुणी या घोषणा दिल्या असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण नेमक्या याच सरकारच्या काळात कशा या घोषणा झाल्या? महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi Government) काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता.

 

यावरून आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, तुमच्या अडीच वर्षांच्या काळात कसे हिरवे झेंडे लागले, त्रिपुरात मशीद पाडली अशी अफवा उठल्यानंतर मालेगाव-अमरावतीत 40-50 हजारांचा मॉब रस्त्यावर आला. हे विसरलात काय आदित्यजी? सरकार गेल्यामुळे तुम्ही एवढे विमनस्क अवस्थेत आहात की तुम्हाला आठवतच नाही की तुमच्या काळात काय काय झाले.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) राज्याबाहेर गेल्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती, त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, कोणत्याही प्रकल्पाचा एक घटनाक्रम असतो. तो आदित्य ठाकरे यांनी सांगावा. पण तुम्ही येथून कोणते कोणते प्रकल्प बाहेर घालवले, याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज एक यादीच जाहीर केली आहे. आहो, आपल्या अहंकारामुळे मुंबईची वाट लावली. मेट्रो प्रकल्पाचा (Metro Project) खर्चही वाढला. त्यामुळे जो काही प्रकल्पांचा घटनाक्रम आहे, तो आमनेसामने मांडा. (Chandrakant Patil)

 

पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आगामी निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले,
आम्ही पुणे महापालिकेची निवडणूक सरकार नसतानाही जिंकणार होतो. आता तर सरकार आले आहे.
मी पालकमंत्री झालो आहे. सरकार नव्हते त्यावेळी आम्हाला 82 जागा मिळतील, असे सर्व्हेमध्ये सांगितले गेले.
पण महापौर (Mayor) होण्यास 85 जागा लागतात. मात्र आता सर्व अनुकूलता आली आहे. त्यामुळे आता आम्ही शंभरी ओलांडू.

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp will get 100 seat in pune PMC elections 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | आमदार माधुरी मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी

Nashik Crime | पतीचा निर्घुण खून करुन पत्नी गेली पळून; दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा

Raj Thackeray | मनसेचा मोठा गौप्यस्फोट ! राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘दसरा मेळाव्यावरून दिला होता ‘हा’ सल्ला, मात्र…’