Chandrakant Patil | ‘2024 मध्ये BJP लोकसभेत 418 जागांच्या खाली येणारच नाही’ – चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | पुढील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘भारत देशात लोकशाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) विरोधात एकत्र येऊन वातावरण निर्माण करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झालाच तर काय होईल माहीत नाही. पण, आजची स्थिती ही आहे की भाजप 418 जागांच्या खाली येणार नाही,’ अस चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यावेळी ते पुण्यात बोलत होते.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बोलताना म्हणाले की. ‘मोदींच्या (PM Narendra Modi) विरोधात कुणीही एकत्र आले तरी सर्वसामान्य माणसांनी काय करायचं ते ठरवलं आहे. 44 कोटी जनधन बँकेची खाती उघडल्यानंतर, 7 कोटी घरात शौचालय झाल्यानंतर, तीन कोटी लोकांना घर मोफत मिळाल्यानंतर आणि आता 70 हजार कोटींची ‘हर घर पाणी’ योजना आल्यानंतर अनेक महिलांच्या डोक्यावरचा हंडा जाणार आहे. प्रत्येक घरी, गावागावात नळाने पाणी येणार आहे. हे सर्व झाल्यानंतर लोकं मोदींनाच मतदान करणार आहेत,’ असं ते म्हणाले.

दरम्यान, ‘भारत देशात लोकशाही आहे. पंतप्रधान मोदींच्या विरोधात एकत्र येऊन वातावरण निर्माण करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झालाच तर काय होईल माहीत नाही. मात्र, आजची स्थिती ही आहे की भाजप 418 जागांच्या खाली येणार नाही, असा एक अहवाल समोर आला आहे. वेगवेगळ्या एजन्सीजने केलेला हा सर्व्हे आहे,’ असं देखील चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp will not come down 418 seats 2024 loksabha election said chandrakant patil in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Udayanraje Bhosale | खा. उदयनराजे भाजपलाही नकोसे?; सातारा जिल्हाध्यक्षांच्या विधानामुळं चर्चेला उधाण

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौर्‍यावर येणार

Kirit Somaiya | ‘राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता देखील अनिल देशमुखांच्या वाटेनेच जाणार’ – किरीट सोमय्या

Kolhapur Crime | ‘आई, घरी सोडतो’ असं म्हणत महिलेला गाडीत बसवलं, काही अंतर गेल्यानंतर दाम्पत्याने महिलेसोबत केला भयंकर प्रकार; कोल्हापुरातील खळबळजनक घटना

Pune Crime | मनाविरूध्द पत्नी PhD करते म्हणून छळ, पतीविरूध्द विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा

Maharashtra Cabinet Meeting | ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ 6 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या

PMSBY | पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ! एक रुपयाची छोटी गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते 2 लाखापर्यंतचा मोठा फायदा, जाणून घ्या कसे?