Chandrakant Patil | ‘मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनीच केलं, शिवसेनेनं कुठ काय केलं?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मुंबईत पाऊस सुरु झाला असून पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. मुंबईतील परिस्थितीवरून विरोधकांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर (Shiv Sena) टीकेची झोड उठवली आहे. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनीही मुबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) कारभारावरुन शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईत म्हातारीचा बुट ब्रिटिशांनी (British) केला, राणीचा बाग ब्रिटिशांनी तयार केला. ब्रिटिशांनीच सगळं केलं. मग शिवसेनेनं मुंबईत काय केलं? याआधी काँग्रेसची (Congress) सत्ता होती. त्यांनीही काही केलं नाही. येत्या महापालिका निवडणुकीत (Municipal elections) मुंबईकर शिवसेनेला जो काही धडा शिकवायचा आहे तो शिकवतील असा हल्लाबोल पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत (Press conference) बोलत होते.
गेल्या 20 वर्षापेक्षा अधिक काळ मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) शिवसेेनेच्या ताब्यात आहे.
गेल्या दीड वर्षांपासून राज्यात देखील शिवसेना सत्तेत आहे.
त्यांचे 40 हजारांचे त्यांचे बजेट असते. 58 हजार कोटींच्या ठेवी आहेत.
पण तरी देखील मुंबईकर पूर्णपणे असुरक्षित आहे.
त्यामुळे मुंबईकर जनता यावेळी शिवसेनेला माफ करणार नाही, असे पाटील म्हणाले.

संजय राऊतांनी (Sanjay Raut) पाटलांना दिल्या वाढदिवसाच्या (Birthday) शुभेच्छा
नाशिक दौऱ्यावर असलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena leader MP Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत.
आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
मात्र वाघाशी मैत्री होत नाही.
कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो, असे राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर खोचक टीका, म्हणाले – ‘आमची मैत्री जंगलातल्या वाघासोबत, पिंजऱ्यातल्या नाही’

Neem Juice : जेवढं कडू तेवढंच फायदेशीर, आजारांना जवळ देखील येऊ नाही देत; जाणून घ्या

संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला, म्हणाले – ‘वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची’

Wab Title :- Chandrakant Patil | british did everything mumbai what did shiv sena mumbai asks chandrakant patil