×
Homeताज्या बातम्याChandrakant Patil | विद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे,...

Chandrakant Patil | विद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे, चंद्रकांत पाटलांचे निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाविद्यालयामध्ये प्रवेशाच्या (College Admission) वेळी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी सीईटी कक्षाने (CET Cell) कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश नियामक प्राधिकरण (Admissions Regulatory Authority) आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (State Common Entrance Test Cell) आढावा बैठक झाली.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी अडचणी आल्या तर त्या विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होते. प्रवेशाच्या अगोदर त्यांच्या कागदपत्राची पडताळणी वेळेत झाली पाहिजे. तसेच सीईटी कक्षाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश घेण्यासाठी जी माहिती असते ती विद्यार्थ्यांना अचूक आणि सुलभरित्या अगोदरच ऑनलाईन उपलब्ध करून दिली तर विद्यार्थ्यांना माहिती होईल आणि विद्यार्थी तयारीला लागतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल आणि प्रवेश घेताना होणाऱ्या चुका कमी होऊन प्रवेश वेळेत होतील. विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत. त्यामुळे ही सुविधा सीईटी कक्षाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर तातडीने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली पाहीजे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

काही ठिकाणी प्रवेश होतात आणि नंतर कागदपत्रे पडताळणी मध्ये विद्यार्थी अपात्र ठरतो.
हे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान आहे. हे नुकसान टाळण्यासाठी प्रवेशापूर्वी त्या विद्यार्थ्यांची पूर्ण कागदपत्रे पडताळणी वेळेत आणि अचूक झाली पाहिजे.
प्रवेशानंतर विद्यार्थी अपात्र ठरला तर कागदपत्रे पडताळणी करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title :- Chandrakant Patil | CET Cell should plan time table in time bound manner Chandrakant Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandni Chowk | चांदणी चौकातील पूल 1 व 2 ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती

Maharashtra Cabinet Decisions | पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरणार, मंत्रिमंडळ बठकीत महत्त्वाचे 14 निर्णय

Pankaja Munde | भगवान भक्तीगडावर दसर्‍याची जोरदार तयारी, पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन, म्हणाल्या – तयारीला लागा…

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News