Chandrakant Patil | वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची सारवासारव, म्हणाले ‘विरोधकांकडून ध चा मा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उच्च आणि तंत्र शिणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीर यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीग मागितली, असे वादग्रस्त विधान केलं आहे. यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वक्तव्याची सारवासारव केली.

 

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
शाळा (School) सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? महात्मा फुले (Mahatma Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती, असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. यावरून वाद निर्माण होताच चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

त्या काळात आपण माधुकरी मागून शिकलो, माधुकरी म्हणजे काय तर भीक मागणे.
भाऊराव पाटील धान्य गोळा करायचे हे तुम्हाला माहिती आहे का? भीक मागून मी माझी संस्था वाढवली हा प्रचलित शब्द आहे.
यात मी काय चुकीचं बोललो? उलट मी त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठीच बोललो, मात्र विरोधक ध चा मा करतात.
आता मला मुक्याची भाषा शिकावी लागेल, पण त्यातही अडचणी आहेत.
कारण विरोधकांकडे कामच उरलं नाही, असं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं.

 

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patals explanation on the statement phule ambedkar and karmaveer begged to start the school

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम

Pune News | ‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच!; भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती