Chandrakant Patil | “महाविकास आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडा”; चंद्रकांत पाटलांचं ओबीसींना आवाहन!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपने (BJP) महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) धारेवर धरलं आहे. कोर्टाने (Court) सरकारला लवकरात लवकर ट्रिपल टेस्ट (Triple Test) करायला सांगितलं होतं मात्र त्यांनी याकडे कानाडोळा केल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

 

या सरकारने ठरवून मराठा समाजाचंही आरक्षण (Maratha Reservation) टिकवण्याचा प्रयत्न केला नाही आणि ओबीसींच्या आरक्षणातही तेच केलं. यांना सगळं कळतं तरीसुद्धा यांना काही करायचं नाही. पोटात दुखणे हा तसा प्रकार आहे. ओबीसी राजकीय आरक्षण नसेल तर महापौर, पंचायत, नगरपालिकांचे (Mayor, Panchayat, Municipalities) प्रतिनिधित्त्व कसं मिळेल?, असा सवाल चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे.

 

आता या सरकारचा बुरखा टराटरा फाडला पाहिजे त्यासाठी आपल्याला संघर्षच केला पाहिजे. पाच वर्ष आरक्षण नसेल त्यामुळे आपण शांत बसणार नाही. आपल्याला गावागावांमध्ये जाऊन संघर्ष करावा लागणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत.
त्यामुळे सभा घ्यायच्या आहेत. राज्यातील जिल्हा अध्यक्षांना मी स्वत: फोन करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patil appeal bjp workers to protest against maha vikas aghadi over obc reservation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा