Chandrakant Patil | कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची बैठक, गाफील राहून चालणार नाही; चंद्रकांत पाटलांचा कर्यकर्त्यांना सल्ला (व्हिडिओ)

0
271
Chandrakant Patil | chandrakant patil held bjp meeting for kasba chinchwad elections no decision on the candidate
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा (Kasba By-Election) आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Chinchwad By-Election) जाहिर झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या घरी झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या दोन्ही निवडणूका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व पक्षांनी निवडणूक होणार हे सूचित केल्याने आमच्या कार्यपद्धतीनुसार आम्ही तयारीला लागलो आहोत, गाफील राहून जमणार नाही, असे म्हणत त्यांनी निवडणुकीची तयारी सुरु झाली असे घोषित केले.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवणार असून शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नेतृत्वाखाली ही पोटनिवडणूक लढवली जाईल. हक्काचा मतदार संघ असूनही जोरदार तयारी करणार आहोत. आम्ही आमच्या कार्य पद्धतीनुसार निवडणूक लढवणार असून उमेदवाराबाबत निर्णय कोरकमिटी घेणार आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये उमेदवाराबाबत चर्चा झाली नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो. इच्छुक उमेदवार हा इच्छा व्यक्त करत असतो. उमेदवारी दिल्यानंतर त्यांची नाराजी राहणार नाही असेही त्यांनी सांगितले. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना वंदन करतो. आम्ही सर्वजण हे मानणारे आहोत कि बाळासाहेबांचे महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या विकासावर, हिंदुत्वाच्या रक्षणामध्ये एक मोठं योगदान आहे. त्यामुळे त्यांना मी अभिवादन करतो आणि या पोटनिवडणुकीची तयारी सुरु झाली असे घोषित करतो.

पोटनिवडणुकीसाठी तीन समित्या

कसबा हा आपला पारंपरागत मतदार संघ असला तरी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) निवडणूक लढवली जाणार असल्यामुळे आम्ही गाफील राहणार नाही. ही निवडणूक अधिक मार्जिनने कशी जिंकता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या पोटनिवडणुकीसाठी तीन समित्या केल्या असून यामध्ये आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) प्रमुख असणार आहेत आणि संजय काकडे (Sanjay Kakade), गणेश बिडकर (Ganesh Bidkar), हेमंत रासने (Hemant Rasane), धीरज घाटे (Dheeraj Ghate) हे प्रमुख समिती मध्ये असणार आहेत.

दुसरी समिती प्रामुख्याने संघटनात्मक आहे. आमची सगळी ताकद ही बुथ प्रमुख, बुथ मिती आहे.
शक्ती केंद्रप्रमुख, शक्ती केंद्र समिती आहे.
असा सगळा आमचा संघटनात्मक ढाचा उभा करण्याचे काम शहराचे संघटनात्मक सरचिटणीस राजेश पांडे
(Rajesh Pandey) करतील. त्यास आमचे शहर सरचिटणीस राजेश येनपुरे (Rajesh Yenpure) सहायक
म्हणून काम करतील.

तिसरी समिती आमची वेगवेगळ्या कामांची असते, ज्याला आम्ही निवडणूक संचालन समिती असं म्हणतो.
कसबा विधानसभेचे आमचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे (Pramod Kondhare) हे त्या समितीचे प्रमुख असतील.

आमची घोषणा दिल्लीत

पुढे बोलताना चंद्राकांत पाटील म्हणाले, इच्छुक उमेदवारांची नावे पाठवण्यात येतील.
त्यातील तीन नावे निवडून विचार केला जाईल. आमची घोषणा गल्लीत नाही तर दिल्लीतून होते.
आम्ही प्रयत्न करु ही जागा बिनविरोध करण्यासाठी तसेच दिल्लीतून नावे जाहीर केले जातील.

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patil held bjp meeting for kasba chinchwad elections no decision on the candidate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Minor Girl Rape Case | मावस भावाकडून 15 वर्षाच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड; मावळमधील घटना

Namrata Malla | नम्रताच्या हॉट फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Shah Rukh Khan | पठाणच्या रिलीजआधी शाहरुख खानने चाहत्यांना दिले ‘हे’ सरप्राइज