Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची काँग्रेसला थेट ऑफर; म्हणाले – ’24 तासांत निर्णय घ्या..’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये (Kolhapur Assembly By Election) भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) आमने – सामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांत खडाजंगी पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात राजकीय शाब्दिक शीतयुद्ध होताना दिसत आहे. अशातच चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसपुढे एक मोठा प्रस्ताव ठेवला आहे.

 

कोल्हापूर पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, ”कोल्हापूर पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसकडून जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण अजूनही 24 तास शिल्लक आहेत. जयश्री जाधव या भाजपच्या होत्या त्यांना परत भाजपमध्ये पाठवा. मी ‘एबी फॉर्म’ बदलतो आणि ही निवडणूक बिनविरोध करतो,” अशी थेट ऑफरच त्यांनी दिली.

दरम्यान, भाजपमध्ये परत यावं आणि निवडणूक लढवावी अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी जयश्री जाधव यांना केली होती. मात्र पती चंद्रकांत जाधव यांनी ज्या पक्षाचा झेंडा घेऊन लढले त्याच पक्षातून आपण लढणार असल्याचे जयश्री यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, म्हणून भाजपाने देखील आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. भाजपकडून सत्यजित कदम (Satyajit Kadam) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

तर चंद्रकांत पाटील सतेज पाटलांवर टीका करताना म्हणाले की, ”ही निवडणूक बंटी पाटील यांच्या अहंकारापायी लादली गेली आहे.
ज्या काही निवडणूका येतील त्या मला द्या, असा त्यांचा स्वभाव आहे.
गोकुळ निवडणूक, जिल्हा बँक निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक सर्व निवडणूका मला द्या,
अशा त्यांच्या स्वभावाने ही निवडणूक लादली गेली.”

 

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patil offer to congress satej patil on kolhapur north assembly by election

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा