Chandrakant Patil | मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत पाटलांचा खुलासा, म्हणाले- ‘दु:ख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य केला, पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तासंघर्षाच्या नाट्यात सर्वांना मोठा धक्का बसला जेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे नाव जाहीर केले. राज्यातील युती सरकारचे नेतृत्व शिंदे करत असले तर असले तरी फडणवीसच हे बॉस असल्याचे अनेकदा दिसले. आता भाजपचे नेते (BJP Leader) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

 

पनवेलमध्ये भाजप कार्यकारणीची बैठक (BJP Executive Meeting) सुरु आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर (Praveen Darekar) उपस्थित आहेत. यावेळी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्यातील सत्तांतराबद्दल हे विधान केले आहे.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, अक्षरश: मनावर दगड ठेवून आपण आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाने दिलेला निर्णय मान्य केला. केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं. याचं दु:ख पचवून आपण सर्व आनंदाने पुढे गेलो आणि हा निर्णय स्वीकारला कारण राज्याचा गाडा पुढे हाकायचा होता. हे सरकार सत्तेत येणं खूप गरजेचं होतं. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यावर टीका करण्याची त्यांची मजल गेली. त्यामुळे हे खूप गरजेचं होतं, असंही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, सलग पाच वर्षे त्यांनी यशस्वीपणे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.
यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. जेव्हापासून शपथ घेतली तेव्हापासून आपण सर्व मुंबईत आहोत.
त्यामुळे आता चला आपल्या घरी. कामाला लागू आणि जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल आणि तेही वेळेत.

 

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patil on central government order about maharashtra chief minister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुणे शहरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 गुन्हे उघडकीस

 

Shivsena | शिंदेंच्या राजकीय हालचालीची माहिती उद्धव ठाकरेंना होती, परंतु…, शिवसेनेने केला खुलासा

 

Shinde Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! पुण्यातील गंभीर प्रकरणासह राज्यातील ‘या’ 2 केसेस CBI कडे वर्ग करण्याचे निर्देश?