Chandrakant Patil | एकनाथ शिंदेंबरोबर तुमचं काही डील झालंय का?; चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) मंत्री आणि शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल एका रात्रीत महाराष्ट्र हादरवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यातच एकनाथ शिंदे सध्या भाजपच्या (BJP) संपर्कात असल्याची मोठी चर्चा रंगली आहे. नाराज असलेले एकनाथ शिंदे 25 ते 30 आमदारांसोबत गुजरातच्या सूरतमधील एका हाॅटेलमध्ये असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंनी अधिकृत माहिती दिली नसली तरी आघाडी सरकारबाबत मोठे तर्कवितर्क लढवले जात आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

“आम्ही एकनाथ शिंदेंना कोणताही प्रस्ताव दिला नाही किंवा त्यांनीही आम्हाला कुठलाही प्रस्ताव दिला नाही. पण त्यांनी वेगळी वाट निवडली आहे. त्यांचं पुढे काय होईल, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही,” असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, “आमची (भाजपची) आणि एकनाथ शिंदेंची चर्चा झाली नाही. कुठलीही पूर्व योजना नाही. एकनाथ शिंदे यांनी वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केलाय. त्याचं पुढे काय होईल, हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही. पण मविआमध्ये मोठा असंतोष आहे. आम्ही आधीपासून सांगत होतो, आता ते सिद्ध झालंय. फडणवीस काय करु शकतात, हे सगळ्यांनीच पाहिलंय.”

दरम्यान, एकनाथ शिंदेच्या भूमिकेनंतर आता भाजप वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचे ते म्हणाले.
अडीच वर्षांपूर्वी अशास्त्रीय पद्धतीने सरकार स्थापन झालं. महिनाभरातच अनेक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत न जाण्याची भूमिका घेतली होती.
त्यामुळे मविआमध्ये मोठा असंतोष आहे, आपल्या पक्षातील मानहानीला कंटाळून विधान परिषद निवडणूकीत काही
आमदारांनी भाजपला मदत केली असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patil press conference after shivsena eknath shinde reach surat maharashtra news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा