×
Homeताज्या बातम्याChandrakant Patil | चर्चेतून नक्कीच मार्ग निघतो!, सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी मी बेळगावला...

Chandrakant Patil | चर्चेतून नक्कीच मार्ग निघतो!, सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी मी बेळगावला जाणार – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि राज्य उत्पादन शूल्क मंत्री शंभुराज देसाई यांची एक समिती नियुक्त केली आहे. या समितीतील चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना बेळगावातील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. येत्या 3 डिसेंबर रोजी चंद्रकांत पाटील बेळगावला भेट देत समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवून बैठकीला बोलावले आहे. हे पत्र पाटील यांनी ट्वीट केले आहे. ‘महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी बेळगावी येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आहे. त्यानुसार मी आणि समन्वयक मंत्री शंभुराज देसाई येत्या 3 डिसेंबर रोजी बेळगाव येथे जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत. भेटूया, चर्चेतून नक्कीच मार्ग निघतो!’ असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि अक्कलकोट भागातील काही कन्नड भाषिक प्रदेशांवर दावा केल्यापासून सीमा प्रश्न पुन्हा वर आला होता. तसेच जत तालुक्यातील चाळीस गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव केल्याचा दावा देखील बोम्मई यांनी केला होता. तो दावा महाराष्ट्र सरकारने फेटाळला आहे. आता महाराष्ट्र सरकारची कर्नाटक सीमा प्रश्नावर न्यायालयात लढाई सुरु आहे. त्यात सम्नवय साधून आणि चर्चा करुन काही मार्ग काढण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. त्यामुळे ही बैठक महत्वाची ठरणार आहे. या बैठकीला शंभुराज देसाई देखील जाणार आहेत.

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patil will visit belgaum on december 3 to discuss the maharashtra karnataka border issue

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे

Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले

Must Read
Related News