Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘कोल्हापूरमधील एका मंत्र्याने कोट्यवधीचा कर थकवला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात सतत अनेक मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आघाडी सरकारच्या मंत्र्यावर अप्रत्यक्ष आरोप शुक्रवारी विधानसभेत केला. ‘महाविकास आघाडी सरकारच्या कोल्हापूरमधील एका मंत्र्याने आपल्या शिक्षण संस्था, बंगले आदींचा कोट्यवधी रुपयांचा महापालिकेचे मालमत्ता तसेच अन्य कर भरले नाहीत, पण त्यांच्यावर कारवाई करण्यास पालिका आयुक्त घाबरत असल्याचे,’ पाटील म्हणाले.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांचे नाव न घेता असा आरोप केला आहे. त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”कोल्हापूरमधील एका मंत्र्याने आपल्या शिक्षण संस्था, बंगले आदींचा कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे कर भरलेले नाहीत, पण अनेक नोटीस जाऊनही सदर मंत्र्यांनी हे कर भरलेले नाहीत. आयुक्त त्यांना घाबरत आहेत. त्यामुळे सरकारने याबाबत सदर मंत्र्याला कर भरण्याची ताकीद द्यावी,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मोफत घरे देणे मला मान्य नाही…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आमदारांना मुंबईत 300 घरे कायमस्वरूपी देण्याची घोषणा केली.
यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ”माझे मुंबईत घर नाही तरीही आमदारांना मोफत घरे देणे मला मान्य नाही.
सरकारने आमदारांना घरे देण्यापूर्वी शेतकर्‍यांना व एसटी कर्मचार्‍यांना पैसे द्यावेत.
तसेच, आमदार सोडून जातील आणि सरकार पडेल अशा भीतीने आमदारांवर वर्षाव करणे चालू आहे.
मतदारसंघाचा विकासनिधी मुळात दरवर्षी 2 कोटी रुपये होता, तो कोरोनाच्या काळात 4 कोटी केला व आता 5 कोटी रुपये केला.” असं चंद्रकांत पाटलांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | Chandrakant Patils serious allegations Said A minister from Kolhapur has spent crores of rupees

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा