‘PM मोदींनी फक्त गुजरातलाच मदत केली हा दावा खोटा’; प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन – तौक्ते चक्रवादळाचा फटका बसलेल्या गुजरातलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केली हा दावा खोटा असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. इतकंच नाही तर मोदींचा महाराष्ट्र दौरा ठरला होता. पण हवामान पाहता त्यांना सल्ला दिला गेला की जाणे योग्य नाही म्हणून त्यांनी दौरा रद्द केला. त्यांनी फक्त गुजरातला मदत केली असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी प्रत्येक मृताला मदत जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातले पण लोक येतात असे पाटील म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जमिनीवर राहण्यासाठी शुभेच्छा असे देखील पाटील यांनी म्हटले आहे.

मुकुल माधव फाऊंडेशन आणि क्रिएटिव्ह फाऊंडेशनतर्फे पुण्यात लोककलावंताना मदत देण्यात आली. त्यावेळी पाटील माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्र्याच्या कोकण दौऱ्याबाबत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी जमिनीवरून प्रवास केला. त्यांचा प्रवास हवेतून नाही तर जमिनीवरून होता. फडणवीस यांचा दौरा 2 दिवसांत पूर्ण पण होत आला आहे. उद्धव ठाकरे कधी नव्हे ते बाहेर पडले आहेत. त्यांचे पाय जमिनीवर राहावेत यासाठी शुभेच्छा. दरम्यान पंतप्रधानांचा बाबतीत रिस्क कमी घेता येते. त्यामुळे हवाई आढावा घेण योग्य असल्याचे त्यांच्या सुरक्षा यंत्रणेने सांगितले. इंदिरा गांधी पण असाच प्रवास केला होता, असे ते म्हणाले.