भाजपच्या ‘या’ बडया नेत्याचा अंदाज, 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर सेना-भाजपकडून विकास कामांचा धडाका लागला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर भाजपने आज (शनिवारी) बैठक घेतली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. बैठकीनंतर राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणूकीच्या तारखेचा अंदाज व्यक्‍त केला आहे.

सन 2014 च्या निवडणुकीत 15 ऑक्टोबरला मतदान झाले होते. यावेळी देखील ऑक्टोबर महिन्यातच विधानसभा निवडणुका होतील असा अंदाज आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. गेल्या वेळी म्हणजेच सन 2014 मध्ये विधानसभेसाठी 15 ऑक्टोबरला मतदान झाले होते. त्यामुळे यावेळी 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल असे म्हंटले आहे.

लोकसभा निवडणूकीतील यश, दुष्काळ आढावा आणि आगामी विधानसभा निवडणूकीची तयारी करण्यासाठी आजची बैठक झाल्रूाचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान निवडणूका होतील किंवा चार-आठ दिवस पुढे मागे होईल पण आतापासुनच सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

सायनसवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही काळजी घेणे गरजेचे

सर्वच व्यायाम महिलांसाठी नसतात, जाणून घ्या कोणते व्यायाम करावेत

लो-इम्पॅक्ट एक्झरसाइज करा…आणि कॅलरीज होतील बर्न

महिलांनो, आकस्मिक गर्भपात झाल्यास अशी घ्या काळजी