खा. उदयनराजेंची ‘ती’ इच्छा देखील पूर्ण केली जाईल : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठे नेते पक्षांतर करत असून आतापर्यंत अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर देखील अनेक मातब्बर नेते पक्षप्रवेशासाठी रांग लावून आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि लोकसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळे ते देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे भाष्य केल्याने सर्वांना धक्का बसला आहे. पाटील यांनी म्हटले कि, जर पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल शेवटी ते राजे आहे. त्यामुळे आता उदयनराजे खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत कि नाही याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्याचबरोबर सध्या ज्यांची चर्चा आहे त्या सर्वांचा एक तारखेला भाजप प्रवेश होणार असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता हे सर्वजण कोण हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे, मात्र त्यांच्यावर कोणताही गंभीर गुन्हा किंवा भ्रष्टाचाराचे आरोप नकोत असेदेखील पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर नारायण राणे यांचा विषय मोठा असल्याने त्याचा निर्णय अमित शहा घेणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एक सप्टेंबर रोजी भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती होणार असून यामध्ये काँग्रेस आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे खासदार धंनजय महाडिक, तसेच राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा समावेश आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like