Chandrakant Patil | वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – महात्मा फुले (Mahatma Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त विधान करणारे भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच औरंगाबाद शहरामध्ये चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविरोधात शहर काँग्रेस (Congress), रिपब्लिकन सेनेने आंदोलन केले.

 

औरंगाबाद शहरातील वेदांत नगर पोलीस ठाण्यात (Vedanta Nagar Police Station) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या विरोधात महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आले. यावेळी विजय वाहुळ, मुकेश खोतकर, नरेश वरठे, विशाल हिवराळे, भीमसेन पट्टेकर, शुभम हिवराळे, मनीष नरवडे, सचिन भुईगळ व भीम सैनिक उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण
शाळा (School) सुरु करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली होती, असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. यावरुन वाद निर्माण होताच चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

 

त्या काळात आपण माधुकरी मागून शिकलो, माधुकरी म्हणजे काय तर भिक मागणे.
भाऊराव पाटील धान्य गोळा करायचे हे तुम्हाला माहिती आहे का? भीक मागून मी माझी संस्था वाढवली हा प्रचलीत शब्द आहे.
यात मी काय चुकीचं बोललो? उलट मी त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठीच बोललो, मात्र विरोधक ध चा मा करतात.
आता मला मुक्याची भाषा शिकावी लागेल, पण त्यातही अडचणी आहेत. कारण विरोधकांकडे कामच उरलं नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले.

 

Web Title :- Chandrakant Patil | complaint against bjp leader chandrakant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम

Pune News | ‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच!; भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती