home page top 1

महाडिकांना हरवण्यासाठीच पवारांनी उमेदवारी दिली : चंद्रकांत पाटील

गारगोटी : पोलीसनामा ऑनलाईन – महाडिकांना संपवण्यासाठीच पवारांनी धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली आहे. कोल्हापूरच्या जनतेचा राग महाडिकांच्यावर आहे. असे खळबळजनक विधान महसूलमंत्री चंद्रकांत पटली यांनी केले आहे. वाघापूर येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. कोलहापुरात धनंजय महाडिक यांच्या विरोधात संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मोहाला बळी पडू नका

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, “पैसा, गाडी, सहली यासारखी वेगवेगळी आमिषे दाखवली जाणार. स्वाभिमानी मतदार या मोहाला बळी पडणार नाहीत. राहिलेले दिवस कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून जागे राहून काम करावे असे आवाहन ना. पाटील यांनी केले. मोदींच्या नेतृत्वाखालील देश सुरक्षित राहू शकतो. देशाच्या सीमा सुरक्षित राहू शकते याची जाणीव जनतेला झाली आहे. त्यामुळे मतदार मोदींच्या हाती सत्ता सोपवतील असा विश्वास त्‍यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ नेते के. जी. नांदेकर, माजी उपसभापती सत्यजित जाधव, जीवन प्राधिकरण समितीचे सदस्य प्रवीणसिंह सावंत, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष अविनाश शिंदे, धनाजी खोत, अजित देसाई, अलकेश कांदळकर, पंचायत समिती सदस्य आक्काताई नलवडे, योगेश परुळेकर, शिवाजी ढेंगे, उपसरपंच बाजीराव जठार, धोंडीराम बरकाळे, यशवंत कुरडे, संतोष बरकाळे, नामदेव चौगुले, दिलीप केणे आदींसह सर भाजप- शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनंजय महाडिक आणि सतेज पाटील वाद मिटवण्यासाठी पावर यांची मध्यस्ती

धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वादाचा सर्वाधिक फटका आघाडीला बसणार आहे. म्हणूनच या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खुद्द शरद पवार या दोघांची भेट घेणार होते. मात्र यावेळी ऐन वेळेला शरद पवार कोल्हापूरात दाखल होताच सतेज पाटील ‘ऑऊट ऑफ कोल्हापूर’ झाले. याचदरम्यान बंटी पाटील समर्थकांनी सोशल मिडियात पोस्ट व्हायरल करणे सुरू केले आहे. ‘पवारसाहेब, आम्ही तुमचा आदर करतो.

आमचा विरोध महाडिक प्रवृत्तीला आहे राष्ट्रवादीला नाही’ असा संदेश बंटी पाटील समर्थकांनी सोशल मिडियावर व्हायरल केले. यातून धनंजय महाडिक यांच्याशी आता जुळवून घेणे शक्य नसल्याचे अप्रत्यक्षरित्या सूचवले. कोल्हापूर मतदार संघात त्यांच्या वादाचा यंदाच्या निवडणुकीत मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

Loading...
You might also like