चंद्रकांत पाटील यांचा नवा गौप्यस्फोट ; ‘गोकुळ’ मुळेच महाडिकांना उमेदवारी

कोल्‍हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. अशातच नेत्यांची एकमेकांवर टीका टिप्पणी करणे सुरु आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाडिकांवर निशाणा साधला आहे. गोकुळचं गणित बिघडू नये म्हणून महाडिक यांना उमेदवारी देण्यात आल्याचे पाटील यांनी म्हंटले आहे. कोल्हापुरात एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

… म्हणून महाडिकांना उमेदवारी

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, “आज धनंजय महाडिक जे काही आहेत ते महादेवराव महाडिक यांच्यामुळेच. ‘गोकुळ’ हा प्राण आहे. त्यामुळे धनंजय महाडिक यांनी जर शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर, गोकुळ फुटेल हे महाडिकांना माहिती होते. त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यायला भाग पाडली, शरद पवारांनी, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी सर्व प्लॅनिंग करून धनंजय महाडीक यांना राष्‍ट्रवादीचे तिकिट घ्‍यायला भाग पाडले. अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

त्यामुळे महाडिक कुटुंब डिस्‍टर्ब

यावेळी बोलताना पाटील म्‍हणाले,  धनंजय महाडीक यांनी शिवसेनेचे चिन्ह घेतले असते तर सगळेच वणवे झाले असते. कारण धनंजय याच्या राष्‍ट्रवादीकडून निवडणूक लढविल्‍यामुळे संपूर्ण महाडीक कुटुंब डिस्‍टर्ब झाले आहे. यामुळे आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक, धनंजय महाडिक हे सर्व डिस्‍टर्ब आहेत. पुढे बोलताना पाटील यांनी महाडीक यांनी ज्‍या गोकुळच्या प्रेमापोटी हे सर्व केले. त्‍या गोकुळला मल्‍टीस्‍टेट होऊ  देणार नसल्‍याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या एनओसी शिवाय गोकुळ मल्‍टीस्‍टेट होऊ शकत नाही, असेही ते म्‍हणाले.

Loading...
You might also like