महिलांच्या सुरक्षेवरून चंद्रकांत पाटलांचा सरकारवर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. याच घटनांच्या मुद्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. लालसी सरकारने आमच्या माता-भगिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याची टीका त्यांनी ट्विट करून केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत म्हटले की, हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न होतो. औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये एका महिलेला जिवंत जाळलं जातं. पनवेलमध्ये देखील असाच प्रकार घडतो. पुण्यातीही सिनेअभिनेत्री मानसी नाईकची छेड काढली जाते. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्था आहे की नाही ? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी ट्विटच्या मध्यामातून उपस्थित केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, सत्ता लालसी सरकारने आज आमच्या माता-भगिनींची सुरक्षा अक्षरश: वाऱ्यावर सोडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज महिला सुरक्षित नाहीत हे किती मोठे दुर्दैवी असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.