Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘अजित पवार हेलिकॉप्टरने जमिनी शोधतात, आयुष्यभर फक्त जमिनी लाटण्याचं काम केलं’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री (Pune Guardian Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. अजित पवार यांनी आयुष्यभर फक्त पैसे काढून घेण्याचं आणि जमिनी लाटण्याचं (Grabs Lands) काम केलं, असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. ते पुण्यातील मांजरी येथील पक्षाच्या कर्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या कामांचा उल्लेख केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसनं (Congress) केवळ जनतेला लुटण्याचं काम केल्याचा आरोप (Allegation) केला.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुढे म्हणाले, अजित पवार हे हेलिकॉप्टरनं (Helicopter) जमिनी शोधण्याचं (Search Land) काम करतात, कुणाची जमीन शिल्लक आहे का पाहतात. धरणाचीही जमीन सोडत नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये त्यांची भीती आहे की जर जमीन दिसली तर त्यावर आरक्षण (Reservation) आणून तीही जमीन लाटतील, असे म्हणत पाटील यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला.

 

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

आज देशातील अडाणी म्हाताऱ्या व्यक्तीलाही काळालं आहे की मोदी थेट बँक खात्यात 6 हजार रुपये देतात.
मग ते मोदींना मतदान करणार की पवारांना? यांनी आयुष्यभर लोकांचे पैसे काढून घेण्याचं काम केलं.
जमिनी काढून घेण्याचं काम केलं. मला असं समजलं की मांजरी गावाला काही वर्षापूर्वी महापालिकेत दाखल करुन घेण्यात येत होतं त्यावेळी गावकऱ्यांनी विरोध केला.
कारण पवार आमच्या जमिनी लाटतील अशी भीती होती.
पवार आमच्या जमिनीवर आरक्षण टाकतील आणि त्या लाटतील अशी भीती लोकांमध्ये होती.
अजित पवार हेलिकॉप्टरमधून फिरतात आणि फक्त कुणाकुणाच्या किती जमिनी शिल्लक आहेत ते पाहतात.
धरण देखील सोडलं नाही, असे पाटील म्हणाले.

 

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या गंभीर आरोपांवर अजित पवार कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक (Pune Municipal Corporation Election) जसजशी जवळ येईल
तसतसे अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे.
दोघांमध्ये आरोपांची मालिका सुरु असताना आता चंद्रकांत पाटील यांनी थेट जमिनी लाटण्याचा आरोप अजित पवारांवर केला आहे.
त्यावर अजित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | Deputy chief minister ajit pawar grabs farmers lands allegations by bjp state president chandrakant patil in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा