Chandrakant Patil | ‘गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला देऊ नका, हा सल्ला मुख्यमंत्र्यांना आधीच दिला होता’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) गृहखात्याच्या कारभारावरून नाराजी नाट्य असल्याची चर्चा आहे. केंद्रीय तपास संस्थानी कारवाईचा (Central Government Agencies Actions In Maharashtra) सपाटा लावल्याने भाजपला (BJP) जशासतसे उत्तर देण्यासाठी शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झाल्याचे दिसत आहे. भाजपला जशासतसे उत्तर द्यावे अशी शिवसैनिकांची भावना आहे. पण भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse Patil) तत्परतेने कारवाई करत नाहीत. अशी चर्चा शिवसेनेत (Shivsena) जोर धरत आहे. यावरुन आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

कोल्हापूरात (Kolhapur News) माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, ”सल्ला देण्याची वेळ निघून गेली.
जसा मी सल्ला दिला होता, राष्ट्रवादीला गृहमंत्रीपद देऊ नका. पण त्यांनी ऐकले नाही.
मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की दुसरा पक्ष खाण्यामध्ये मास्टर आहे आणि तो खाल्लं की बाजूला फेकतात असा ज्यांचा इतिहास आहे.
पण हे सल्ले ऐकण्याच्या मनस्थितीत उद्धवजी आजही आहेत असे मला वाटत नाही.”
गृहखात्याच्या नाराजीनाट्याच्या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्र्यांना काय सल्ला द्याल ? यावर पत्रकारांच्या प्रश्नांवर पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

दरम्यान, माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावरही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
”महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे सांगत, महिलांबाबत इतकी आत्मीयता आहे तर महाडिक यांच्या नावाने टाहो फोडण्यापेक्षा करुणा मुंडे (Karuna Munde) यांना न्याय द्यावा,” असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | dont give the post of home minister to ncp this advice was already given to the chief minister says chandrakant patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा