Chandrakant Patil | उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न- चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शासकीय स्तरावर 75 हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे (Skill Development) प्रशिक्षण आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विभागीय रोजागार मेळाव्यात (Maharashtra Rojgar Melava 2022) ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, राज्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी रिक्त पदे (Vacancies) भरण्यासोबत आवश्यक नवी पदे निर्माण करण्याच्या सूचना विविध विभागांना देण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात एकाचवेळी 6 ठिकाणी अशा स्वरूपाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील 2 हजार 33 उमेदवारांना आज नियुक्तीपत्र (Appointment Letter) देण्यात येत आहे. बेरोजगारी दूर करणे, चांगले, अनुभवी, कुशल मनुष्यबळ प्रशासनात आणणे आणि या माध्यमातून राज्याच्या प्रगतीला गती देणे हा यामागचा उद्देश असल्याचे पाटील म्हणाले.

कायद्याची आणि शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी प्रशासनाची आहे. नवनियुक्त उमेदवारांनी क्षमतेने काम करीत प्रशासकीय सेवेच्या (Administrative Service) माध्यमातून नागरिकांना सेवा देण्याचे कार्य करावे, असे आवाहन देखील पाटील यांनी केले. उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी संबंधित विभागांचे अभिनंदन केले.

316 पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र

राज्य शासनाने एका वर्षात 75 हजार युवकांना रोजगार देण्याचा ‘महासंकल्प’ केला असून त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे विभागामध्ये ऊर्जा (Energy), परिवहन (Transport) आणि ग्रामविकास विभागात (Rural Development Department) एकूण 316 पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao) यांनी दिली. नवनियुक्त उमेदवारांनी आपल्या विभागाला सर्वोच्च स्थान देऊन शासकीय सेवेत समर्पित भावनेने उत्कृष्ट काम करावे. निवड झालेल्या उमेदवारांनी आयुष्यातील हा ‘संकल्प दिवस’ समजून राज्याच्या प्रगतीला हातभार लावण्याचा संकल्प करावा असेही ते म्हणाले.

शासकीय सेवेत आल्यावर देशसेवा घडते

राज्यातील युवकांना जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा
(State Government) प्रयत्न आहे. उमेदवारांना निर्धारित वेळेत नियुक्ती देण्यासाठी महावितरणने मोहीम
स्तरावर कागदपत्रांची छाननी केली. व्यक्तीने एखादा व्यवसाय केल्यास त्याची आर्थिक उन्नती होते,
मात्र शासकीय सेवेत आल्यावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबत देशसेवा घडत असते. नियुक्ती झालेल्या उमेदवारांवर
अंधारलेल्या घरात प्रकाश पोहोचविण्याची जबाबदारी आहे. उद्योग क्षेत्राला तत्परतेने सेवा दिल्यास देशाच्या
प्रगतीलाही हातभार लागणार असल्याने सर्वांनी पूर्ण क्षमतेने काम करावे, असे मत प्रादेशिक संचालक नाळे यांनी व्यक्त केले.

Web Title :- Chandrakant Patil | Efforts to create large employment opportunities in the industry sector

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या वडिलांनी शेअर केले तिचे बेडरुम सिक्रेट, म्हणाले – ‘मी तिच्या खोलीत जातो तेव्हा…’

Maharashtra Rojgar Melava 2022 | 75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात, फडणवीसांनी केलं ‘हे’ आवाहन (व्हिडिओ)

Maharashtra Revenue And Forest Department Officers Transfer | अपर जिल्हाधिकारी संवर्गातील 8 अधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्त्या

Jayant Patil | तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले- जयंत पाटील