Chandrakant Patil | अखेर ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून व्यक्त केली दिलगिरी, म्हणाले….

0
249
Chandrakant Patil Finally Chandrakant Patil wrote a letter to the Maharashtra State Women's Commission expressing regret over statement on ncp mp supirya sule saying
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यावर ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरुन टीका केली होती. ‘घरी जाऊन स्वयंपाक करा. तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या’, अशा शब्दात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेवरुन मोठा राजकीय गदारोळ पहायला मिळाला होता. विशेष म्हणजे त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्य महिला आयोगाकडे (State Women’s Commission) तक्रार देखील करण्यात आली होती. यानंतर राज्य महिला आयोगाने चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. या सर्व घडामोडीनंतर अखेर पाटील यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली (Apologize) आहे.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलगिरी व्यक्त करणारं पत्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना पाठवले आहे.
या पत्रात त्यांनी आपल्यासोबत गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरु असलेल्या टीकेवरुन नाराजी व्यक्त केली आहे.

 

काय म्हटले पत्रात ?
चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटले की, आयुष्याची 45 वर्षे सामाजिक (Social), राजकीय (Political) जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा,
Helpers of the Handicap, सावली, आई, संवेदना आणि वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी (Women Empowerment) रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या,
जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी,
ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत 12 महिला आमदार (MLA) आणि देशाच्या लोकसभेचे महाराष्ट्रातून 5 महिला खासदार आहेत.
मला सुप्रियाताईंबद्दल आणि महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणींचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दु:ख नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

माझ्या ओबीसी बंधू – भगिनिंना राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता – भगिनींचा अपमान झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
भाजपने काढलेल्या मोर्चात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती.
कशासाठी राजकारणात (Politics) राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही,
कळत नाही एका मुख्यमंत्र्याची (CM) भेट कशी घ्यायची असते ? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं ? आता घरी जाण्याची वेळ आली आहे.
एवढेच नाही, तर तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे ते म्हणाले होते.

 

 

Web Title :- Chandrakant Patil | Finally Chandrakant Patil wrote a letter to the Maharashtra State Women’s Commission expressing regret over statement on ncp mp supirya sule saying

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा