ताज्या बातम्यामुंबईराजकीय

Chandrakant Patil | ‘या’ कारणामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले’; चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चर्चा संपूर्ण राज्यात रंगली होती, मात्र काल सत्तास्थापनेवेळी अचानक फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. फडणवीस यांना सोडून शिंदे यांना मुख्यमंत्री का केलं? याबाबत सवाल सर्व स्तरातून भाजपवर (BJP) उपस्थित केला जातोय. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, “हिंदुत्व हा आमचा श्वाास, ध्यास आहे. भाजपाची स्थापना आरएसएसच्या विचारसरणीतून झाली आहे. मात्र 2019 मध्ये युती झाली परंतु निकालानंतर हिंदुत्व मागे पडले आणि खुर्ची पुढे आली. विश्वासघात झाला. ज्यांचा हिंदुत्व अजेंडा नाही. हिंदुत्व ज्यांना मान्य नाही अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून महाविकास आघाडी झाली. छत्रपतींनी मुघलांशी संघर्ष केला. देव, देश आणि धर्मासाठी लढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. सुरुवातीला महाशिवआघाडी नाव दिले परंतु त्यातील शिव काढून टाकला,” असा आरोप त्यांनी केला.

 

“शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी अस्वस्थतेबद्दल उठवलेला आवाज यात प्रत्येक आमदाराचा वैयक्तिक राग होता. अंतर्गत कलहाने हे सरकार पडेल. त्यातून पोकळी निर्माण होईल. तेव्हा पर्यायी सरकार देऊ असं आम्ही सांगितले. विधान परिषदेच्या निकालात 134 मते भाजपला मिळाली. संख्याबळ असूनही सत्तेचा मोह नाही. सामान्य हिंदुत्वासाठी लढणाऱ्या आनंद दिघेंचे विचार जपणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. देवेंद्र फडणवीस आणि पाच जणांशिवाय हे कुणालाही माहिती नव्हते. हिंदुत्वासाठी त्याग करतो. सत्तेचा मोह आम्हाला नाही. खुर्चीचा मोह नाही. खुर्चीसाठी आम्ही हिंदुत्व सोडलं नाही,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदे शिवसैनिक नाही हे आता सांगता? इतके वर्ष त्यांनी पक्षासाठी त्याग केला.
घरोघरी फिरले. बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) इच्छा होती सर्व सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवू. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले.
एका खऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवले सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मुख्यमंत्री राहिलेला माणूस मंत्री होतो.
अशोक चव्हाण (Ashok Chavan) पीडब्ल्यूडी मंत्री राहिलेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झालेले पहिलं उदाहरण नाही.
प्रशासनाची आवश्यकता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत सहभागी व्हावं लागले. पक्षाचा आदेश आमच्यासाठी सर्वस्व असतो.
जे आपल्या मंत्रिमंडळात होते त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी मोठे मन लागते. ते मोठे मन देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलं.”

 

दरम्यान, “राम मंदिरासाठी निधी गोळा करणाऱ्यांची टिंगल केली. तुम्ही वर्गण्या गोळा करता मात्र आम्ही निधी म्हणतो.
कोरोनामध्ये मंदिर बंद, दारूची दुकाने सुरू राहिली. मतांसाठी लांगुनचालन हे उद्धव ठाकरेंनी केले.
अजानच्या स्पर्धा आयोजित केल्या. मशिदीवरील भोंग्याला विरोध करताना 28 हजारांहून जादा मनसेच्या (MNS) कार्यकर्त्याना नोटिसा बजावल्या.
हिंदुत्वाला वेळोवेळी विरोध झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन केला,” असा आरोपही पाटील यांनी केला आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | for this reason eknath shinde was made the cm bjp leader chandrakant patil made it clear

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raj Thackeray | ‘पक्षाचा आदेश व्यक्तीच्या आकांक्षापेक्षा मोठा असतो हे तुम्ही कृतीतून दाखवून दिलं’, राज ठाकरेंचं फडणवीसांना खास पत्र

 

Pune Minor Girl Rape Case | बारा वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

 

Atul Bhatkhalkar | ‘सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरेंना सहन होत नाही’, भाजपची टीका

Back to top button