Chandrakant Patil | ‘स्वबळावर सरकार स्थापन करणार, चंद्रकांत पाटलांनी आखला ‘हा’ कृती प्लॅन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | भारतीय जनता पक्षाने (BJP) युती करून 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, युती तुटल्याने विरोधी बाकावर बसायला लागलं. 105 आमदार (105 MLAs) असताना देखील भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागलं. सत्ता मिळण्यासाठी राज्यात अनेक प्रयत्न केले जात आहेत. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाराष्ट्रात स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना एक मोठा कृती प्लॅन (Action plan) सांगितला आहे.

काय आहे कृती प्लॅन?
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘आपल्याला आता राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करायचे आहे. 140 आमदार निवडून येण्यासाठी 1 कोटी 70 लाख मतांची गरज असते. आपण स्व. अटल बिहारी वाजयपेयी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच 25 डिसेंबरपर्यंत राज्यातील 2 कोटी लोकांना भारतीय जनता पक्षाच्या समितीचे सदस्य करत आहोत. याबाबत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

Chandrakant Patil give action plan bjp party workers form government its own

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितलं आहे की, ‘महाराष्ट्रामध्ये आपले (BJP)
106 आमदार असून देखील आपली मते आहेत 1 कोटी 42 लाख. 1 कोटी 70 लाख मतं ज्याला
मिळतात त्याला स्वबळावर सरकार स्थापन करता येते. एकट्याच्या ताकदीवर 140 जागा
जिंकायच्या असतील 1 कोटी 70 लाख मतं आवश्यक आहेत. आपण काय म्हणतोय की 25 डिसेंबरपर्यंत 2 कोटी लोकांना भाजपाचं सदस्य करायचं. मग 140 येतील की अधिक येतील. 1 कोटी 70 लाखाला 140 जागा येतात. 30 लाख अधिक झाले. राज्यात एकट्याने सरकार आणायचे असेल तर हे अभियान यशस्वी करावे लागेल. हे एकट्याने होणार नाही. त्यासाठी OBC आघाडीने प्रयत्न केले पाहिले. आदिवासी आघाडी, जनता युवा यांनी ठरवलं पाहिजे त्यातून राज्यात भाजपाचे 2 कोटी सदस्य होतील त्यावेळी राज्यात भाजपाचं सरकार येईल. असा प्लॅन पाटील यांनी सांगितला आहे.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘2014 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने
राज्यात स्वबळावर निवडणूक लढवली होती. आणि त्यावेळी 122 जागा भाजपने जिंकल्या होत्या.
दरम्यान 2019 मध्ये शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपा (BJP) यांनी युती करून निवडणूक
लढवली होती. त्यावेळी भाजपाला 105 जागा जिंकल्या याबाबत एक भविष्याचा कृती प्लॅन
(Action plan) चंद्रकांत पाटील यांनी आखला आहे.

हे देखील वाचा

Shilpa Shetty | …म्हणून राज कुंद्राने भेट दिलेला बुर्ज खलिफामधील 50 कोटींचा फ्लॅट शिल्पाने विकला

‘सावळे सुंदर रूप मनोहर’ गाण्याच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड पहिल्यांदाच दिसणार अल्बम सॉंग मध्ये (व्हिडिओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Chandrakant Patil give action plan bjp party workers form government its own

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update