Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची सतेज पाटलांना डायरेक्ट ऑफर; म्हणाले – ‘काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, आमदार करतो’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीवरुन (Kolhapur By Election) सध्या काँग्रेस (Congress) आणि भाजपा (BJP) यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. आज (बुधवारी) उमेदवारी अर्ज दाखल केले गेले. भाजपकडून सत्यजित कदम (Satyajit Kadam) आणि काँग्रेसकडून जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांच्यात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. ‘काँग्रेसचा उमेदवार भाजपकडे द्या, आम्ही आमच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांना आमदार करतो’ अशी थेट ऑफरच चंद्रकांत पाटलांनी दिली.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बोलताना म्हणाले की, ”काँग्रेसचा उमेदवार भाजपकडे द्या, आम्ही आमच्या उमेदवराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांना आमदार करतो, असा सरळ प्रस्तावच त्यांनी सतेज पाटलांना दिला, अजूनही काही तास शिल्लक असून यावर निर्णय घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.’ त्याचबरोबर ”पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणायला अजित पवार यांचा विरोध आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा फटका बसला असून जीएसटीमध्ये आणल्यास तीस रुपयांनी इंधन स्वस्त होईल,” असा दावा देखील त्यांनी केला.

 

दरम्यान, कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे गतवर्षी निधन झाले आहे.
त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त असल्याने या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.
आज कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी थेट काँग्रेसलाच ऑफर दिली.

 

Web Title :- Chandrakant Patil | give congress candidate to bjp make him mla chandrakant patil offer to satej patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा