Chandrakant Patil | शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pune Ganeshotsav | The meeting of public Ganeshotsav Mandals in Baner concluded! Ganesha mandals should emphasize on CCTV, cultural programs and traditional instruments - Minister Chandrakant Patil

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | अनुसूचित जाती व जमातीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत योजनांची माहिती देण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम स्तुत्य असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्यात येईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. (Chandrakant Patil)

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे (Dr. Kiran Moghe) यांनी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रसिद्धी उपक्रमांची माहिती दिली.

अनुसूचित जाती व जमातीच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनावर आधारित विविध विषयांवर लघुचित्रफीती तयार करण्यात आल्या आहेत. एलईडी स्क्रीन असलेले दोन चित्ररथ जिल्ह्यातील सुमारे १५० गावातून फिरणार आहे. चित्रफितीच्या माध्यमातून शासकीय योजनांवर आधारित यशकथा आणि योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. वाहनावरही योजनांची माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धी मोहिमेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे सहकार्य लाभले आहे.

Web Title :- Chandrakant Patil | Guardian Minister Chandrakant Patil inaugurated Chitraratha, which provides information about government schemes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | देवेंद्रजी, गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का?, संजय राऊतांनी बार्शीमधील ‘त्या’ पीडित मुलीचा फोटो केला शेअर

CM Eknath Shinde – Gopinath Munde | लोकनेते गोपीनाथराव मुंडे अठरा पगड जातींना न्याय देणारे व्यक्तिमत्व – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune ACB Trap | पोलिस निरीक्षकाकरिता 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारा निघाला आमदाराचा चुलत भाऊ, युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’

Maharashtra Politics | ’48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? शिवसेना 125 ते 130 जागा लढवणार’, शिंदे गटाच्या आमदारांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल

Gold Price Today | सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; ‘एवढ्या’ रुपयांवर पोहोचले सोने

Jayant Patil | ‘…तोपर्यंत शिंदे गटाचं अस्तित्व उरणार नाही’, बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन जयंत पाटीलांचा शिंदे गटाला धोक्याचा इशारा

Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीचा गोंधळींबरोबर गोंधळ घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

Total
0
Shares
Related Posts