Chandrakant Patil | पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Attack) यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. ते एका कार्यक्रमातून निघत असताना अचानक त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. त्यांच्यावर शाई फेकणाऱ्या इसमाला आणि त्याच्या अन्य साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्याप कोणीही या शाईफेकीची (Chandrakant Patil Attack) जबाबदारी घेतलेली नाही.

 

 

शाळा किंवा महाविद्यालये सुरू करण्यासाठी सरकारवर अवलंबून का राहता? महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालये सुरू केली. त्यावेळी त्यांना सरकारने अनुदान दिले नाही. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या आणि चालविल्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरून राज्यात वादंग उठले आहे. शनिवारी त्याच रागातून पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमातून बाहेर पडत असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली.

 

Web Title :- Chandrakant Patil | ink throw on chandrakant patil at pimpri chinchwad

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nilesh Lanke | भाजपच्या “या” नेत्याच्या आश्वासनानंतर महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचे नीलेश लंकेंचे उपोषण मागे

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई