Chandrakant Patil | ‘एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार हे हास्यास्पद’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये (By-election) भाजपला (BJP) मोठ्या प्रमाणात पराभव स्विकारावा लागला आहे. भाजपला दादरा नगर हवेलीचा (Dadra Nagar Haveli) शिवसेनेचा विजय जिव्हारी लागल्याचे शिवसेनेने (Shivsena) म्हटले आहे. शिवसेनेच्या स्थेपनेपासून पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचा खासदार निवडून आला आहे. यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत महाराष्ट्राबाहेर पहिले पाऊल, दादरा नगर हवेली मार्गे दिल्लीकडे लंब उडी घेणार असल्याचे म्हटले होते. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. एका विजयाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्लीला जाणार हे हास्यास्पद आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टोला लगावला आहे.

 

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, दसऱ्याच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.
की तुम्ही दुसऱ्याचे उमेदवार घेऊन निवडणूक लढवली. पण, तुम्ही काय केलं.
दादरा नगर हवेली मधील उमेदवार तुमचे होते का? आम्ही दुसरे उमेदवार घेतले तर आमच्यावर टीका टीप्पणी केली जाते.
पण, तुम्ही तेच करता त्याचे काय? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

 

डेलकर यांनी आत्महत्या (Delkar commits suicide) केल्याने सहानुभूतीची लाट होती. त्यामध्ये तुम्ही निवडून आलात.
आता बाकीच्या निवडणुका सुद्धा शिवसेनेने त्यांच्या चिन्हावर लढवाव्यात. एका विजयाने उद्धव ठकारे दिल्लीला जाणार हा हास्यास्पद दावा आहे.
सर्वसामान्यांना हे आवडेल की नाही ते बघा असेही पाटील म्हणाले.

 

महाराष्ट्र सरकारची दानत नाही

 

केंद्र सरकारने इंधन दर कपात (Fuel rate reduction) केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी इंधनावरील दर कमी करण्याची महाराष्ट्र सरकारची दानत नाही असे म्हटले आहे.
केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर त्यांचे दर कमी होतील.
केंद्राने केल्यानंतर महारष्ट्रात दर कपात करण्याची परंपरा नाही.
केंद्राने केले तसे आपणही करु अशी दानत महाराष्ट्र सरकारची नासल्याने मी काही आशावादी नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Web Title : Chandrakant Patil | its ridiculous that uddhav thackeray will go to delhi with a victory chandrakant patil on shivsena mp sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Traffic Police | दिपोत्सवानिमित्त सारसबाग, स्वारगेट परिसरातील वाहतुकीत बदल

Radhakrishna Vikhe Patil | ‘राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडले’ – विखे पाटील

Latur District Bank Election | काँग्रेसला झटका, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत बाद ठरलेले विरोधाकांचे अर्ज वैध