Chandrakant Patil | ‘… तर कंगना बरोबर आहे’, कंगनाच्या वादग्रस्त विधानानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन 2014 पासून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलेल्या कामावर खुश होऊन देशाला स्वातंत्र्य (freedom) मिळाल्याचा अनुभव नागरिकांना मिळायला लागला, असे कंगना राणौतला (Kangana Ranaut) म्हणायचे असेल तर ते बरोबर आहे. मात्र, त्यासाठी 1947 च्या स्वातंत्र्यावर टीका करण्याचा त्यांना अधिकार नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कंगनाची पाठराखण केली. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

नेमकं काय म्हटले कंगनाने ?

 

कंगना म्हणाली होती की, रक्त वाहणारचं होतं, पण भारतीयांचं रक्त वाहायला नको होतं. त्यांना माहित होतं आणि त्यांनी त्याची किंमत मोजली.
1947 मध्ये जी मिळाली ती भीक होती, देशाला स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं आहे.
असे वादग्रस्त विधान कंगनाने केले होते. या वक्तव्यानंतर तिच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

 

तिचे वाक्य पूर्णत: चुकीचे

 

कंगनाच्या वक्तव्यावर बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, कंगना राणौतच्या भावना नेमक्या काय आहेत मला माहीत नाही.
परंतु तिचे वाक्य पूर्णत: चुकीचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यावर नकारात्मक टिप्पणी करण्याचा कुणालाही अधिकार नाही.
देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव मिळतो.

 

दोन वेळचे जेवण मिळत नाही असा माणूसच देशात राहिला नाही. 105 रुपयात 35 किलो धान्य मिळत आहे.
घरं मिळत आहेत, स्वच्छतागृह अशी मोठी यादी आहे.
2014 नंतर नरेंद्र मोदींनी केलेल्या कामावर खूष होऊन नागरिकांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत असेल तर ते बरोबर आहे.
असे म्हणत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कंगनाची पाठराखण केली.

 

Web Title : Chandrakant Patil | kangana controversial statement reaction mla chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nawab Malik | ‘भाजपच्या एका माजी मंत्र्यानं मंदिराची शेकडो एकर जमीन हडपलीय’; मलिकांचा आणखी एक बाॅम्ब

Anna Hazare | अण्णा हजारेंनी ST कामगारांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले…

ST Workers Strike | ‘अनिल परब तुम्ही 6 व्या मजल्यावरुन उतरला नाहीत, पण महाराष्ट्राच्या मनातून उतरलात’ – मनसेचा हल्लाबोल