Chandrakant Patil | राज्यातील विधानपरिषद निवडणूक बिनविरोध? चंद्रकांत पाटील म्हणाले…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | राज्यात काही दिवसांत विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक (Legislative Council by-election) येऊन ठेपली आहे. या पार्श्वभुमीवर पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. या मुद्द्यावरुन बोलताना भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक मोठं विधान केलं आहे. चंद्रकांत पाटील आज (मंगळवारी) कोल्हापुरात होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, ‘काँग्रेस नेत्यांच्या (Congress) विनंतीला मान देत राज्यसभा व विधानपरिषदेची 1 जागा आम्ही बिनविरोध केलीय. आता राज्यातील विधानपरिषदेच्या 6 जागांबाबत काँग्रेसने चांगला प्रस्ताव दिल्यास ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची तयारी आहे, असं पाटील म्हणाले. तसेच, आतापर्यंत असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचा खुलासा देखील त्यांनी केला आहे.

 

पुढे ते म्हणाले, ‘मुंबईतील 1 जागा वगळता आम्ही कोल्हापूर, नागपूर, अकोला, धुळे या सर्व ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेत. नागपूर, धुळे आम्ही एकतर्फी जिंकणार आहोत. अकोला आणि कोल्हापुरात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. मुंबईतील 1 जागा शिवसेनेला तर दुसरी भाजपला मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 6 पैकी 5 जागा भाजप जिंकणार अशी स्थिती आहे. अशावेळी काँग्रेसकडून चांगला प्रस्ताव आल्यास निवडणूक बिनविरोध करण्याची आमची तयारी आहे.

 

 

दरम्यान, ‘या निवडणुकीत शिवसेना एका जागेवर लढत आहे. राष्ट्रवादी (NCP) कुठेच लढणार नाही.
त्यामुळे 5 जागांबाबत काँग्रेसने प्रस्ताव दिला तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
आतापर्यंत असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही.
आला तर तो प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्याकडेच येईल.
पैसा, वेळ वाया घालवत न बसता ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत भाजपची भूमिका लवचिक असेल.
परंतु, बिनविरोध बाबत आम्ही प्रस्ताव देणार नाही. त्यांचा आला तर स्वीकारू अन्यथा ही निवडणूक ताकदीने लढवू. असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Web Title :- Chandrakant Patil | maharashtra mlc election if there is a good proposal from congress we will consider it says chandrakant patil in kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा