Chandrakant Patil Meets Sanjay Kakade | संजय काकडेंची नाराजी दूर करण्याचे भाजपाचे प्रयत्न, चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrakant Patil Meets Sanjay Kakade | पुणे लोकसभेचे (Pune Lok Sabha Election 2024) महायुतीचे (Mahayuti) भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे. भाजपाचे सर्व स्थानिक नेते त्यामध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहेत. मात्र, भाजपा नेते संजय काकडे अजूनही प्रचारात सहभागी झाल्याचे दिसत नाहीत. त्यामुळे काकडे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, ही नाराजी दूर करण्यासाठी आज भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काकडे यांची भेट घेऊन मनधरणी केली आहे.

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी नाराज भाजपा नेते संजय काकडे यांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील यांनी या भेटीत काकडेंना प्रचारात सहभागी होण्याची विनंती केल्याचे समजते. तसेच काकडे यांनीही मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे, पाटील यांना सांगितले आहे.(Chandrakant Patil Meets Sanjay Kakade)

नुकतेच संजय काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेली फूट आणि दुभंगलेल्या पवार कुटुंबियांतील (Pawar Family)
बिघडलेल्या संबंधावरून दुख व्यक्त केले होते. पवार कुटुंबियांनी निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी
केले होते. परंतु, ही फूट भाजपाने पाडलेली नाही, असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, संजय काकडे पक्षापासून अलिप्त राहात असल्याचे जाणवल्याने चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू

Amol Kolhe | मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे