Chandrakant Patil | ‘सर्व प्रकारच्या गुन्ह्याशी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचं नाव जोडलं आहे’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता स्थापन झाल्यापासून आघाडी आणि भाजप यांच्यात वारंवार राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळते. भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या मुंबईत (Mumbai) झालेल्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात बोलताना भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल केला आहे. ”राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामुहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही, इतके हे सरकार संवेदनाशून्य झालं आहे.” असं पाटील म्हणाले.

 

त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, ”सत्ताधारी महाविकास आघाडीने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. जवळ जवळ सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचे नाव जोडले गेले आहे. राज्यात सामुहिक बलात्काराच्या दुःखदायक घटना घडत आहेत पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्याचे काही वाटत नाही. त्रिपुरात जी घटना घडली नाही तिच्या अफवेवरून मालेगाव, अमरावती, नांदेड येथे दंगली होतात, त्यासाठी 15-20 हजार लोक रस्त्यावर येतात व पोलिसांवर हल्ला करतात याचीही आघाडीला चिंता नाही. त्यानंतर हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली तरीही भाजपावर आरोप करतात. अंमलीपदार्थांचे समर्थन केले जाते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी स्थिती झाली असताना आपल्याला संघर्ष चालू ठेवायचा आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे पाटील म्हणाले, राज्यात प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणे ही आपली भूमिका आहे.
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करावा म्हणून राज्यात चारशे ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांची आंदोलने झाली.
एसटी कामगारांच्या संपात भाजपाचा सक्रीय सहभाग आहे.
सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) कामगारांचे नेतृत्व करत आहेत असे ते म्हणाले.
तसेच, भारतीय जनता पार्टी प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत असून आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | name any minister associated all kinds crimes bjp chandrakant patil mva

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘कायद्याचं राज्य नव्हे, ‘काय ते द्या’चं राज्य’

Trupti Khamkar | अभिनेत्री तृप्ती खामकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, ‘झोंबिवली’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Kolhapur Crime | हनी ट्रॅपला कंटाळून 32 वर्षीय युवकाची आत्महत्या? सुसाईडपुर्वी चिठ्ठीत लिहिला मोबाईलचा Password