Chandrakant Patil | ‘चंद्रकांतदादा, आता त्यांनाही स्वयंपाक करण्याचा सल्ला द्याल का?’ – राष्ट्रवादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल (UPSC Result 2021) आज जाहीर झाला. या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून देशात पहिल्या चार या मुलीच आल्या आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यावर टीका केली होती. याच टीकेवरून राष्ट्रवादीने टोला लगावला आहे.

 

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घरी जा आणि स्वयंपाक करा असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता तसेच महिला आयोगाकडून (Maharashtra State Women’s Commission) जबाब मागितला होता. त्यानंतर त्या वक्तव्याबद्दल दिलगीर व्यक्त केली होती. यानंतर आता युपीएससी निकालात मुलींनी मिळवलेल्या यशानंतर ‘चंद्रकांतदादा, आता त्यांनाही ‘घरी जा, स्वयंपाक करा’ असा सल्ला द्याल का?’ असा सवाल राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या निकालामध्ये यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिले चार क्रमांक पटकावत मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. चंद्रकांतदादा, आता त्यांनाही घरी जा, स्वयंपाक करा असा सल्ला द्याल का?

 

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी देखील या मुलींचे कौतुक करत, UPSC परीक्षांचे निकाल जाहीर झाले
असून आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्या चारही क्रमांकाच्या मानकरी महिलाच आहेत.
अष्टावधानी स्त्री कुठल्याच क्षेत्रात कुणापेक्षाही कामी नाही, हेच यातून पुन्हा अधोरेखित होतेय, असे ट्विट केले आहे.

 

 

Web Title :- Chandrakant Patil | ncp slam bjp chandrakant patil over upsc result 2021 ranking

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC Q4 Results | एलआयसीच्या नफ्यात झाली घसरण, गुंतवणुकदारांना मिळेल इतका लाभांश

 

HotStock Alerts | सीधा सौदा : असे स्टॉक्स ज्यामध्ये ट्रेड घेऊन तुम्ही करू शकता दमदार कमाई

 

Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी