Chandrakant Patil On Bhim Jayanti | पुण्यात चंद्रकांत पाटलांकडून डॉ. आंबेडकरांना अभिवादन, विरोधकांना म्हणाले ”संविधान बदलावर मी डिबेट करायला तयार”

पुणे : Chandrakant Patil On Bhim Jayanti | भाजप नेते तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. भाजपा सरकार संविधान बदलण्याच्या तयारी आहे, असा आरोप विरोधकांकडून होत आहे, यावर विरोधकांना आव्हान देताना पाटील म्हणाले, संविधान बदलावर मी डिबेट करायला तयार आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, निवडणुकीच्या काळात हा अतिशय आवडता आरोप आहे. संविधान कधीही बदलता येत नाही. त्यात दुरुस्ती करता येते. आत्ता पर्यंत संविधानात १०६ वेळा दुरुस्ती झाली आहे. यातील बहुतांश दुरुस्ती या काँग्रेसच्या काळात झाल्या आहेत. यात बरोबर होते की, चुकीचे हा विषय नाही. अलीकडे मोदीजींनी दोन दुरुस्त्या केल्या. दुरुस्ती म्हणजे जे नव्हत ते आणले आहे. (Chandrakant Patil On Bhim Jayanti)

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, मोदीजींनी २६ नोव्हेंबर रोजी घटना दिवस साजरा करायला सुरवात केली. विरोधकांकडून होत असलेले आरोप हे जुने झालेत. मी यावर डिबेट करायला देखील तयार आहे.

डॉ. आंबेडकरांचे योगदान सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक उपकार आपल्यावर आहेत.
संपूर्ण देशाला त्यांनी दिलेली घटना फार मोठी देणगी आहे.
पुढचे हजार वर्ष घटनेचा मूळ भाव बदलावा लागणार नाही.
जगामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.
बाबासाहेबांमुळेच मोदीजींसारखे चहा वाल्याच्या घरात जन्म घेणारे पंतप्रधान झाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त