Chandrakant Patil On Jayant Patil | चंद्रकांत पाटलांनी सांगितला ’50 खोके एकदम ओक्के’चा अर्थ, जयंत पाटलांवर पलटवार करताना म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil On Jayant Patil | भाजपाने (BJP) एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मदतीने शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पाडल्याचे दोन्हीकडील काही वरिष्ठ नेत्यांनीच वेळावेळी कबुल केले आहे. बंडखोर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे सुरतमार्गे जेव्हा गुवाहटीला गेले तेव्हापासूनच सर्व आमदारांवर खोक्याचा आरोप होत आहे. म्हणूनच विरोधकांची ‘पचास खोके एकदम ओक्के’, ही घोषणा महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आहे. अशाच प्रकारची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती, यावर आता भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी पलटवार (Chandrakant Patil On Jayant Patil) केला आहे.

 

खोक्यांचा अर्थ सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले, खोक्यांच्या अर्थ आंब्यासाठी वापरले जाणारे खोके हाच, आमच्यासारख्या सामान्यांचा हाच अर्थ आहे. जयंत पाटील यांनी खोक्यांचा वेगळा अनुभव वर्षानुवर्ष घेतल्यामुळे महाराष्ट्राची वाट लागली. आमच्यावर टीका करणार्‍याचे 10 विषय आहेत. ग्रामविकासात 1500 कोटी रुपयांचा टेंडर घोटाळा (Tender Scam) झाला आहे. त्या खोक्यांची सवय तुम्हालाच आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात लवकरच ग्रामविकास विभागात (Rural Development Department) 20 हजार पदांची भरती होणार आहे, याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरीची एक मर्यादा आहे. पद भरतीसाठी कोण आंदोलन करत असेल तर करू द्या. (Chandrakant Patil On Jayant Patil)

 

सामना वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या पदभरती जाहिरातीवरून मनसेने (MNS) केलेल्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी म्हटले की, आजकाल कशावरही टीका केली जाते. सामना शिवसेनेचे मुखपत्र असले तरी तो एक कमर्शियल पेपर आहे, ते कुणाच्याही जाहिराती देऊ शकतात. आता कुठल्या पानावर जाहिरात छापायची ते त्यांच्या मनावर आहे.

महापालिका निवडणुकांबाबत (Municipal Election) ते म्हणाले, पालिका निवडणुकींचा विषय सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आहे,
कोर्ट मॅटर असताना निवडणुका घेता येत नाहीत आणि त्यामुळे सरकार निवडणुका घ्यायला घाबरतं, अशा टीका करणे योग्य नाही.

 

गुजरात विधानसभा निवडणुकीवर चंद्रकांत पाटील म्हणाले, गुजरातमध्ये आम्ही 1985 पासून सत्तेत आहोत,
दुसरे कुणाचेच सरकार आले नाही. ज्यांचे डिपॉझिट जप्त होते अशा लोकांनी निवडणुका जवळ आल्यावर
आम्ही जिंकणार असा दावा करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न त्यांनी केला.

 

Web Title :- Chandrakant Patil On Jayant Patil | chandrakant patil reacts on allegations of jayant patil khoke government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! 18 महिन्यांच्या DA एरियरबाबत आली मोठी माहिती

Central Government Employees News | सरकारी कर्मचार्‍यांसाठी IMP बातमी; GPF चा नियम बदलला, जाणून घ्या

Maharashtra Revenue And Forest Department Officers Transfer | अपर जिल्हाधिकारी संवर्गातील 8 अधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्त्या