Chandrakant Patil On Kolhapur North By Election | ‘आमचे नाना लढले तर तोंडाला फेस आला, मी लढलो तर काय होईल?’ – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil On Kolhapur North By Election | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Kolhapur North Assembly By-Election) निकालामध्ये काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) विजयी झाल्या आहेत. तर, भाजपकडून (BJP) असलेले सत्यजित कदम (Satyajit Kadam) यांचा मोठा पराभव झाला. या निकालानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसला आणि मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांना टोला लगावला आहे. (Chandrakant Patil On Kolhapur North By Election)

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, ”आम्ही कोल्हापुर पोटनिवडणूक ही विकासावर लढलो आहे. देशात, राज्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये संधी मिळाली आहे. कोल्हापूरसाठी पालकमंत्र्यांनी काय केलं हे सांगावं, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपाचे उमेदवार नाना (सत्यजित) कदम लढले तर विरोधकांच्या तोंडाला फेस आला, मग मी लढलो तर काय होईल पहा,” असा अप्रत्यक्षरित्या टोला पाटील यांनी काँग्रेसला लगावला आहे. (Chandrakant Patil On Kolhapur North By Election)

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ”हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे. हिंदुत्व हेच पुरोगामीत्व आहे. सावरकर हिंदुत्ववादी होते. ते विज्ञाननिष्ठ होते. आपल्या धर्माचं पालन करताना हिंदूंनी इतरांचा आदर केला पाहिजे. हिंदुत्व आमचा अजेंडा नाही तर श्वास आहे. इतर पक्षासारखी राजकीय गरज म्हणून ही भूमिका भाजपाने मांडलेली नाही. या मतांमध्ये 18 हजारांचा फरक पडला आहे. ही लढत 3 पक्ष विरुद्ध 1 पक्ष अशी झालीय. आम्ही एकट्याने 77 हजार मते क्रॉस केली आहेत.” असं ते म्हणाले.

 

दरम्यान, ”भाजपने सत्ताधाऱ्यांना तोंडाला फेस आणला.
ही अटीतटीची निवडणूक होती. हे देशाच्या लोकशाहीचे सौदंर्य आहे.
भाजपाने नागरिकांनी दिलेला कौल मान्य केला आहे.
यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
दडपशाही, दंडुकेशाही, जातीचा वापर या सगळ्याला न घाबरत त्यांनी काम केलं,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांचं कौतुकही केलं आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil On Kolhapur North By Election | BJP leader chandrakant patil criticized on congress leader and maharashtra minister satej patil kolhapur by election final result

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा