Chandrakant Patil On Kolhapur North By Election Result | कोल्हापूरच्या पोटनिवडणूकीत भाजपचा पराभव ! ‘आता तुम्ही हिमालयात निघून जाणार का ?’, चंद्रकांत पाटील म्हणाले…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil On Kolhapur North By Election Result | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल (Kolhapur North By Election Result 2022) लागला आहे. यामध्ये काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांनी भाजपच्या (BJP) सत्यजीत कदम (Satyajit Kadam) यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपने आपल्या दिग्गज नेत्यांचा फौजफाटा कोल्हापूरमध्ये पाठवला होता मात्र जनतेने जयश्री जाधव यांना कौल दिला आहे. अशातच यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Chandrakant Patil On Kolhapur North By Election Result)

 

ज्याला वाटत असेल त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या कोणत्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा. पोटनिवडणूक लावायची, निवडून नाही आलो तर राजकारण सोडून हिमालयात (Himalaya) जाईल, असं चंद्रकांत पाटील यांनी एक चॅलेंज केलं होतं. मात्र आता त्यांना या पोटनिवडणुकीत पराभव पदरी आल्याने पत्रकारांनी त्यांना हिमालयात जाण्याबद्दलची आठवण करून देत एक प्रश्न विचारला.

उत्तर कोल्हापूरसाठी (North Kolhapur) आम्ही काय करणार आहोत हे सांगितलं होतं. यामध्ये वाहतूककोंडी (Traffic Problems) आणि पूर येऊ नये याबाबत आम्ही काय करणार आहोत हे जाहीर केलं होतं. मात्र जनतेने आम्हाला कौल दिला नाही तरीही आम्हाला त्यांचा निर्णय मान्य असल्याचं पाटील म्हणाले. हिमालयात जाण्याबाबत ते म्हणाले, मी काय करायचं ते पक्षश्रेष्ठी ठरवतील, असं पाटील म्हणाले.

 

दरम्यान, आज (शनिवारी) सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली होती. 26 टेबलांवरती 26 फेऱ्यांत 357 केंद्रावरील मतमोजणी करण्यात आली.
यात अगदी पोस्टल मतांच्या फेरीपासूनच घेतलेली मतांची आघाडी जयश्री जाधव यांनी शेपटपर्यंत कायम ठेवत विजयाची कमान रोवली आहे.
जयश्री जाधव या 18, 901 मतांनी विजयी झाल्या आहेत. या विजयाचा उत्साह कोल्हापूरसह राज्यात दिसून येत आहे.

 

Web Title :-  Chandrakant Patil On Kolhapur North By Election Result | we accept defeat party will take decision says bjp leader chandrakant patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा