Chandrakant Patil On Pune PMC Water Supply | पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे; जायका व शहरातील पाणी पुरवठा समस्येचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

पुणे : Chandrakant Patil On Pune PMC Water Supply | हवामान विभागाने पुढील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असण्याचे संकेत दिले असल्याने पुणे महानगरपालिकेने Pune Municipal Corporation (PMC) आतापासून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच समान पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी, असे असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. (Chandrakant Patil On Pune PMC Water Supply)

शासकीय विश्रामगृहात जायका Japan International Cooperation Agency (JICA), २४ x ७ पाणी पुरवठा योजना (Pune 24 x 7 Water Supply) आणि पुणे शहरातील पाणी समस्येबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), भिमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar), रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade), विकास ढाकणे (Vikas Dhakane), पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar PMC) आदी उपस्थित होते. (Chandrakant Patil On Pune PMC Water Supply)

मैलापाणी शुद्धीकरणासाठी नवीन प्रकल्प उभारण्यासोबत अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा. कालबद्ध पद्धतीने जायका प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करावे. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रीया केल्यानंतरचे पाणी औद्यागिक क्षेत्राला देऊन तेवढ्या प्रमाणात औद्योगिक कारणासाठी दिले जाणारे पाणी शहरासाठी वापरण्याच्या शक्यतेबाबत अभ्यास करावा.

समान पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी करताना इलेक्ट्रोमॅग्नेटीक फ्लोमीटरमुळे निदर्शनास आलेली पाणी गळती कमी करण्यासाठी आवश्यक उपाय योजावेत.
कमी पाणी मिळत असलेल्याची तक्रार असलेल्या भागात पाणी पुरवठा सुरळीत होईल यासाठी तेथील कामे
प्राधान्याने पूर्ण करावीत. उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी,
असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले.

समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी साठवण क्षमता २३ टक्क्यापासून ३३ टक्क्यापर्यंत वाढविण्यात येणार आहे.
त्यासाठी २८७ द.ल.लिटर क्षमतेच्या ८२ नव्या टाक्या उभारण्यात येणार असून त्यापैकी ४३ ची कामे पूर्ण
झाली आहेत, तर १२ टाक्यांचा उपयोग सुरू करण्यात आला आहे. २१ टाक्यांची कामे सुरू आहेत.
पाण्याचे ऑडीट करण्यासाठी २४६ पैकी २३५ इलेक्ट्रोमॅग्नेटीक फ्लोमीटर बसविण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जायका प्रकल्पांतर्गत नवे ११ शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याद्वारे ३९६ द.ल.लिटर मैलापाणी
शुद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी १९ ठिकाणी ५५ किलोमीटरच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.
अमृत योजनेतून जुन्या प्रकल्पांची क्षमता वाढ करण्यात येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

Web Title :  Chandrakant Patil On Pune PMC Water Supply | Pune Municipal Corporation should properly plan drinking water; Guardian Minister Chandrakant Patil’s review of Jaika and water supply problem in the city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘किती हा ढोंगीपणा?’, चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी

CM Eknath Shinde | ‘सावरकर होण्याची लायकी नाही’, एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात; लवकरच राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ सरु करणार (व्हिडिओ)

Chandrakant Patil | ‘किती हा ढोंगीपणा?’, चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी