Chandrakant Patil On Sanjay Raut | चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर पलटवार; म्हणाले – “मी शिवरायांचा वंशज नाही, पण…’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil On Sanjay Raut | शिवसेना नेते आणि माजी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर होत असलेल्या आरोपांवर उत्तर दिलं आहे. त्यावेळी त्यांनी भाजप (BJP) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरही टीका केली आहे. तसेच, संभाजीराजेंच्या (Sambhaji Raje) उमेदवारीवरून देखील त्यांनी भाष्य केलं आहे. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

 

”संभाजीराजे छत्रपती आणि आमचा विषय आहे, भाजपने त्यामध्ये चोंबडेपणा करू नये,” असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. ”मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्यज्ञान आहे. पण हिंदुत्वविरोध्यांसोबत चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली ? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल ? आणि हो… सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्व प्रवक्त्यांना कुणी दिला ?” असं चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?
संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून होत असलेल्या टीकेवरून भाजपला चांगलेच फटकारले. ते म्हणाले की, “या राज्यात विरोधीपक्ष आहे पण ते विरोधासाठी विरोध करताना दिसत आहे. एखादा निर्णय घेतला की त्यावर टीका करायची हे त्यांनी ठरवलं आहे. यातून त्यांना कोणता असुरी आनंद मिळतो काय माहीत नाही, पण त्याची पर्वा न करता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ठामपणे पुढे चालली आहे.”

 

Web Title :- Chandrakant Patil On Sanjay Raut | maharashtra bjp chief chandrakant patil counter attack on shivsena MP sanjay raut over sambhajiraje

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा