Chandrakant Patil on Uddhav Thackeray | ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil on Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयामुळे मध्य प्रदेशमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (Madhya Pradesh OBC Political Reservation) मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश निवडणूक आयोगाला दिला आहे. यामुळे मध्य प्रदेश सरकारला एक मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर आता महाराष्ट्रात आरोपांचं सत्र सुरू झालं आहे. मध्य प्रदेश सरकारला जमतंय, महाराष्ट्र सरकारला का जमत नाही ? असा सवाल भाजपने (BJP) उपस्थित केला आहे. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

”मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षण गमावले व अनुसूचित जाती – जमातींच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा घोळ केल्यानंतर आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे कायमस्वरुपी गंभीर नुकसान केले आहे. या अन्यायाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ”सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने झटपट एम्पिरिकल डेटा (Empirical Data) गोळा करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळविले. पण महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे एम्पिरिकल डेटा गोळा करण्यात टाळाटाळ करुन ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या केली,” असा आरोप त्यांनी केला आहे.

 

पुढे ते म्हणाले, ”राजकीय आरक्षणाच्या बाबतीतही महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) अपयशामुळेच ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आघाडी सरकारने अनुसूचित जाती – जमातींच्या पदोन्नतीमधील आरक्षणात घोळ केला.
धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्यासाठी एक पाऊल टाकले नाही.
एकूणच महाविकास आघाडी सरकारमुळे समाजाच्या सर्व घटकांचे नुकसान झाले आहे.
याची जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे.”

 

Web Title :- Chandrakant Patil on Uddhav Thackeray | chandrakant patil demand resignation of chief minister uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा