सगळं एकदम OK ! खा. उदयनराजेंचा आणि नारायण नारायण राणेंचा BJP प्रवेश ‘निश्चित’, दादांनी सांगितलं

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला माझ्याकडून कुठलाही खोडा नाही, त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. माझे त्यांच्याशी काल बोलणे झाले, त्यांनी दिल्लीमध्ये पुढच्या आठवड्यात प्रवेश करतो असे सांगितले आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात तारीख ठरेल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करत उदयनराजे यांच्या भाजप प्रवेश निश्चित असल्याचे संकेत दिले.

खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर खुद्द चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, खासदार उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला माझ्याकडून कुठलाही खोडा नाही, त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. मी त्यांच्यासोबत काल बोललो. त्यांनी दिल्लीमध्ये पुढच्या आठवड्यात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तारीख देखील पुढच्या आठवड्यात ठरेल.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या इतर नेत्यांच्या पक्ष प्रवेशावर बोलताना ते म्हणाले की, 1 तारखेपर्यंत ज्यांची पक्ष सोडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, त्यांना 1 तारखेला तर बाकीच्यांचा 5 तारखेला पक्ष प्रवेश होईल.

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर बोलताना ते म्हणाले की, नारायण राणे यांच्याबाबत भाजप मित्रपक्षांसोबत चर्चा करुन मगच त्यांचा भाजप प्रवेश निश्चित केला जाईल, राणे यांच्या पक्ष प्रवेशावर कोणाचा विरोध असेल तर त्याची समजूत काढली जाईल.

राणेंचा प्रवेश निश्चित झाल्याशिवाय त्यांच्या मुलांच्या तिकीटाचा देखील निर्णय होणार नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे यांच्या बरोबर बोलणार आहेत असे ही चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केले.

शरद पवार का चिडले माहीत नाही –
शरद पवारांच्या चिडण्यावर पाटील यांना विचाराले असता ते म्हणाले की, शरद पवार का चिडले हे मला माहिती नाही. जे भाजपमध्ये प्रवेश करत आहे त्यांना येत्या 5 वर्षात देशाचा आणि राज्याचा विकास पाहायला मिळेल. यावेळी पुढचा मुख्यमंत्री कोण? हे देखील पक्ष श्रेष्ठी ठरवतील असे देखील सूचक वक्तव्य त्यांनी केले.

आरोग्यविषयक वृत्त –