Chandrakant Patil | दोन वर्षात फक्त फसवणूक केली, लोकांचे पैसे लुटले; चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडी सरकारला सणसणीत टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. ही दोन वर्षे महाविकास आघाडीने निव्वळ लोकांची फसवणूक (Cheating) करण्यात घालवली अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मी दोन वर्षे पूर्ण झाली म्हणून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणार नाही. मी त्यांचा निषेधच करणार असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यावेळी म्हणाले.

 

महाविकास आघाडी सरकारची अधोगती, सामान्य नागरिकांची झालेली ससेहोलपट ही गेले सात दिवस आम्ही मांडत असल्याचं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. दोन वर्षात विकासाची काहीच कामं झाली नाहीत. एकच धंदा जोरात सुरु आहे तो म्हणजे पैशाचा.
दोन वर्षात न चुकता भ्रष्टाचार (Corruption) करण्याच काम महाविकास आघाडी सरकारने केल्याचे पाटील म्हणाले.

 

छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) वक्तव्यावर त्यांनी पलटवार केला. छगन भुजबळ हे अतीशय खोटं बोलणारं व्यक्तीमत्व आहे.
त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका. मागील दोन वर्षात सरकारने घेतलेले निर्णय आत्तापर्यंत कोर्टात टीकलेले नाहीत असं म्हणत महाविकास आघाडी,
ठाकरे सरकारवर (Thackeray government) त्यांनी निशाणा साधला. महिला दिशा कायदा (Disha Act) करतो असं सरकार म्हणालं होतं. महिला आयोगाची अध्यक्ष आता नियुक्त केली.
दिशा कायद्याचं काय होणार? बॉडीलँग्वेज पासून ते दोन वर्षात केलेल्या कामांबद्दल पाटलांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

 

Web Title : Chandrakant Patil | Only cheated in two years, robbed people of money; Chandrakant Patil’s Maha Vikas Aghadi slammed the government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Uddhav Thackeray | महाराष्ट्रामध्ये पुन्हा Lockdown लागणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला स्पष्ट इशारा

Urfi Javed | उर्फी जावेदनं परिधान केला खुपच बोल्ड ड्रेस, काळा तिळावर पडल्या सर्वांच्या नजरा अन्…

Mahavikas Aghadi Government | भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी न होण्यामागे ‘ही’ आहेत कारणे