Chandrakant Patil | पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली; म्हणाले – ‘आमचा कुठलाही देव…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुणे येथे आयोजीत एका कार्यक्रमात बोलताना एक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आपला कुठला देव बॅचलर नाही, तसेच महापुरूषही बॅचलर नाही. असे वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakantdada Patil) यांनी केले आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पुण्यात राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना चंद्रकात पाटील (Chandrakantdada Patil) म्हणाले की, ‘हिंदू हा धर्म नाही हा एक विचार आहे. हिंदू राजाने कधीही कुठल्या धर्मावर आक्रमण केलेलं नाही. आपला सनातन धर्म ५ हजार वर्षांपूर्वीचा आहे. हिंदू या शब्दातच सर्वधर्मसमभाव आहे. हिंदू विचारांमध्ये त्याचा आणि माझा देव एकच हा विचार मांडला आहे.’ असे ते म्हणाले.

‘आपला कुठलाही देव बॅचलर नाही, आपले कुठलेही महापुरूषही बॅचलर नाहीत. संसार करून सगळं करता येतं. सेवाही करता येते. जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याचं रक्त हिरवं किंवा निळं आहे. देवाने माणसाला घडवताना कुठलाही भेद केला नाही. सगळ्यांना सारखचं बनवून पाठवलं. सगळ्यांना दोन कान, दोन डोळे आणि समान शरीर देवाने दिलं आहे. माणसाचा जन्म हा स्पर्मपासून होतो. स्पर्म कुणाला दिसत नाही तो स्पर्म १०० किलोचा माणूस तयार करतो. तो माणूस कसा आहे हे ठरवतो. त्या स्पर्ममधून माणूस निर्माण करणारा कुणीतरी आहे ना? सगळी माणसं त्याने बनवली आहेत. इंग्रज आले आणि आपली संस्कृती बदलली. आईला मम्मी आणि वडिलांना पप्पा म्हणायाला लागलो. आपली संस्कृती विसरलो.’ असे यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावेळी त्यांनी एसपी कॉलेजच्या कट्ट्यावर जायला मुलं का घाबरतात? यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला.
ते म्हणाले की, ‘ आत्ताची मुलं एसपी कॉलेजच्या कट्ट्यावर जायला घाबरतात.
पूर्वी मुलं मुलींची टिंगल करायचे आता मुली मुलांची टिंगल करत आहेत. हिंदू एक विचार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला धर्म वाचवला आणि जगवलाही. नाहीतर सगळ्यांची सुंता झाली असती.’ असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, आपल्या संस्कृतीवर भाष्य करताना ते म्हणाले की, ‘मुघलांनी आपल्या देवांवर हल्ले केले.
मात्र आक्रमणापासून वाचवण्यासाठी त्यांच्या मुलीही लपवल्या.
मुघलांनी मुलींचा चेहरा कुणी पाहू नये म्हणून घुंगट आणले. पण आता तिला बाहेर काढा.
तिला शिकू द्या. आपल्या जगात तीन संस्कृती आहेत.
एक सांगते बापाला मारा, दुसरी सांगते तू तुझा विचार कर दुसऱ्याचा विचार सोडून दे,
तिसरी आपली हिंदू संस्कृती आहे जी सांगते तू आधी दुसऱ्याला मोठं कर हिंदू शब्दावर आक्षेप असेल तर
भारतीय म्हणा पण ही संस्कृती दुसऱ्याला मोठं करणारी आहे.’ असे गौरवोद्गार त्यांनी हिंदू संस्कृतीवर भाष्य करताना म्हणाले.

Web Title :- Chandrakant Patil | our god is not a bachelor even the legend is not a bachelor statement of chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uorfi Javed | ‘उर्फी जिथे दिसेल तिथे तिचं तोंड फोडेनं’ ! चित्रा वाघ यांच्या धमकीनंतर उर्फीची महिला आयोगाकडे धाव

Pune Crime News | आंबेगावात तरुणाचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून

Navi Mumbai ACB Trap | सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी, तलाठ्यावर एसीबीकडून FIR