Chandrakant Patil | … म्हणूनच मोठे पवार मैदानात उतरले – चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत सेवेच्या माध्यमातून पोहचा. महापालिकेत (Pune Corporation) पुन्हा भाजपची (BJP) सत्ता येईल असा संकल्प करा असे आवाहन करतानाच, आगामी महापालिका निवडणूक अवघड आहे. छोटे पवार कमी पडले म्हणून आता मोठे पवार मैदानात उतरले आहेत, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

 

व्हिडीओ पाहण्यासाठी आवश्य पोलीसनामाच्या फेसबुक पेजला भेट द्या (Watch Video On Policenama Facebook Page. Just Click Here)

 

आमदार पाटील यांच्या द्विवार्षिक कार्याच्या अहवालाचे मंगळवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar), खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) , शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) , महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) आदी उपस्थित होते.

 

 

आमदार पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, सेवा हेच संघटन आहे. निवडणूक जिंकणे अवघड नाही,
त्यासाठी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. सेवेचा संकल्प करा.
त्या माध्यमातून महापालिकेवर सत्ता येईल. सत्ता आल्यानंतर लोकांची सेवा करा.
महापालिकेमध्ये आता ९७ नगरसेवक आहेत.
ते सर्व निवडून येतील पण त्यामध्ये आणखी २५ नगरसेवक कसे निवडून येतील यासाठीही प्रयत्न करण्यास सांगितले.
दरम्यान, यावेळी प्रकाश जावडेकर यांच्यासह विविध वक्त्यांची भाषणे झाली.

हे देखील वाचा

Indian Railways | रेल्वेने दिला इशारा! प्रवासादरम्यान जर झाली ‘ही’ चूक, तर 3 वर्षासाठी जेलसह भरावा लागेल ‘दंड’

Maharashtra Covid Vaccination | महाराष्ट्राने केला विक्रम; 3 कोटी लोकांचे पूर्ण लसीकरण करणारे देशातील पहिले राज्य

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Chandrakant Patil | pune corporation election chandrakat patil say back to power comments on ajit pawar and sharad pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update