Chandrakant Patil | भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील अपघातातून थोडक्यात बचावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरुड येथील चांदणी चौकात (Chandni Chowk,kothrud) कामाची पाहणी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बुधवारी केली. कामाची पाहणी करत असताना चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले. चांदणी चौक येथील उतारावर पत्रकारांशी संवाद साधत असताना तीव्र उतारावरुन येणाऱ्या दुचाकी चालकाची गाडी त्याठिकाणी असलेल्या गर्दीत घुसली. त्यावेळी चंद्रकांत पाटीलही (Chandrakant Patil) तिथे उपस्थित होते.

सुर्दैवाने कार्यकर्ते आजूबाजूला असल्याने चंद्रकांत पाटील यांना काहीही झालं नाही. दुचाकीस्वाराने मद्यपान केल्याच्या शंकेवरुन कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कर्यकर्त्यांना थांबवलं. ‘थांबा त्याला मारु नका’, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संतप्त कार्यकर्त्यांना शांत केल.

कार्यकर्त्यांना शांत केल्यानंतर पाटील यांनी दुचाकीस्वाराची चौकशी केली.
तुला लागलं नाही ना अशी विचारपूस त्यांनी केली.
पाटील यांच्या मध्यस्थीनंतर कार्यकर्त्यांनी दुचाकीस्वाराला तेथून जाऊ दिले.
हा सर्व प्रकार बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.

Web Title :- Chandrakant Patil | pune kothrud accident in front of chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Delta Variant | लसीकरणाने तयार होणार्‍या अँटीबाडी समोर निष्प्रभ होतो कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, शास्त्रज्ञांचा दावा

Pune Crime | सीटी स्कॅन मशीन देण्याच्या आमिषाने डॉक्टरांना 18 लाखांना गंडा

Pune Crime | सायबर चोरट्यांनी Lombard जनरल इन्शुरन्स कंपनीला केले ‘टार्गेट’; कंपनीतून बोलत असल्याचे सांगून देशभरात अनेकांची केली फसवणूक