Chandrakant Patil | ‘किती हा ढोंगीपणा?’, चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ओबीसींच्या अवमानाच्या मुद्यावरुन पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (Pune NCP) भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या मतदारसंघात ‘किती हा ढोंगीपणा?’ अशा आशयाचे फ्लेक्स लावण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) मतदारसंघात अशा प्रकारे फ्लेक्स लावण्यात आल्याने राजकीय (Pune Political News) वातावरण तापण्याची शक्यता आहे.

हिंम्मत असेल तर महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर आगोदर कारवाई करा? आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले (Krantisurya Mahatma Jyotiba Phule) व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Krantijyoti Savitribai Phule), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) व इतर महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना पाठीशी घालणारे आज ओबीसींच्या (OBC) मान-अपनाच्या गोष्टी करणार? हा ढोंगीपणा बास करा, अशा मजकूराचे फ्लेक्स चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या मतदारसंघात लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीकडून लावण्यात आलेल्या या फ्लेक्सवर उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis),
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Former Governor Bhagat Singh Koshyari),
आमदार चंद्रकांत पाटील, विनोद तावडे (Vinod Tawde) यांचे फोटो छापण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातला ओबीसी तुमच्या या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे या फ्लेक्सवर लिहिण्यात आले आहे.

Web Title :  Chandrakant Patil | pune ncp has planted flexes against chandrakant patil in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police – DG Medals | DG संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्या डीसीपी स्मार्तना पाटील, एसीपी बजरंग देसाई, रूक्मीणी गलांडे, निवृत्त एसीपी प्रतिभा जोशी, लक्ष्मण बोराटे, व.पो.नि. प्रताप मानकर, वैशाली चांदगुडे यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदारांचा गौरव (Video)

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची खुर्ची धोक्यात, न्यायालय मुख्यमंत्रीपद काढून घेऊ शकते? जाणून घ्या सविस्तर

MNS Leader Sandeep Deshpande | राहुल गांधींना इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेचा टोला, म्हणाले-‘…की घरी बसून अंडी उबवणार?’