25 वर्षापुर्वी स्कुटरवर फिरणारे 500 कोटींचे मालक ? राज ठाकरेंकडे एवढे पैसे आले कोठून : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा ‘सवाल’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नुकतीच ईडीने राज ठाकरे यांची साडे आठ तास चौकशी केली. यानंतर अनेक स्तरांतुन यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती. ईडीची कोणतीही चौकशी राजकीय हेतून प्रेरित नाही. पंचवीस वर्षांपूर्वी साध्या स्कुटर वर फिरणारे देशभरातील शंभर नेते अचानक पाचशे कोटींचे मालक कसे काय होऊ शकतात ? राज आणि उन्मेष यांच्याकडे पैसे कोठून आले याचा विचार करणार नाही का ? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले ईडीची चौकशी लगेच लावता येत नाही, निवडणुका पाहून ती होत नसते त्यामुळे राजकीय हेतूच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. तसेच उदयनराजेंच्या प्रवेशाबाबत विचारले असता पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज पक्षात आले तर आनंदच आहे असे म्हटले. मात्र याबाबत अजून निर्णय घेतलेला नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. विधानसभेच्या जागांबाबतची चर्चा येत्या गणेशोत्सवात होणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like